Landslide Agrowon
ताज्या बातम्या

Ratnagiri Rain : रत्नागिरीत पूर ओसरला; पावसाचा जोर कायम

Ratnagiri Flood News : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे; मात्र पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. रत्नागिरीतील काजळी, राजापुरातील कोदवली आणि संगमेश्‍वरमधील शास्त्री, सोनवी आणि बावनदीचा पूर ओसरला.

Team Agrowon

Ratnagiri News : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे; मात्र पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. रत्नागिरीतील काजळी, राजापुरातील कोदवली आणि संगमेश्‍वरमधील शास्त्री, सोनवी आणि बावनदीचा पूर ओसरला. देवरुखमध्ये कोढ्रण येथे भूस्खलन झाले असून गावातील सुमारे पंधराहून अधिक कुटुंबातील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस गुरुवारी (ता. २७) रात्रभर सुरूच होता; मात्र शुक्रवारी (ता. २८) सकाळच्या सत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागात जनजीवन पूर्वपदावर आले. चांदेराई बाजारपेठेतील लहान-मोठी १०० हून अधिक दुकाने तर चांदेराईतील ६ घरे, हरचेरीतील काही घरे पुरामुळे बाधित झाली.

राजापूर तालुक्यातील कोदवली-अर्जुना नदीचा पूर ओसरला असून बाजारपेठेपर्यंत आलेले पाणी कमी झाले. शिळ गावातील शेकडो एकर भातशेतीतील पाणी कमी झाल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाले आहेत. संगमेश्‍वरमधील नावडी परिसरातील पूर ओसरला.

संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्रण गावात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने दगड, माती कोसळून एक घर जमीनदोस्त झाले. सुदैवाने या घरात कोणीही राहत नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. कोंढ्रण एसटी बसथांब्यापासून ५०० मीटरपर्यंत रस्ताही खचला आहे. येथील ७० हून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच गावात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.

मंडणगड तालुक्यातील भोळवली धरणाला कोणताही धोका नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ७७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगडमध्ये ७७ मिमी, दापोली ७२, खेड ४७, गुहागर ६६, चिपळूण ९०, संगमेश्‍वर १०८, रत्नागिरी ९५, लांजा १६१, राजापुरात ८२ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २०९२ मिमी पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT