Bogus Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Fertilizer : ‘केपीआर’च्या खतांचे पाच नमुने फेल

Fertilizer Market : शेतकऱ्‍यांच्या अडचणींचा फायदा घेत कृषी केंद्रातून बोगस खतांची विक्री करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत ‘केपीआर सिंगल सुपर फॉस्फेट’ खताचे पाच नमुने फेल झाले आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : शेतकऱ्‍यांच्या अडचणींचा फायदा घेत कृषी केंद्रातून बोगस खतांची विक्री करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत ‘केपीआर सिंगल सुपर फॉस्फेट’ खताचे पाच नमुने फेल झाले आहेत. त्यांच्या विक्रीवर बंदी घालत ५०० बॅगांचा साठा ‘होल्ड’ करण्यात आला आहे, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून एकही हंगाम शेतकऱ्यांना साथ देत नाही. लागवड खर्चही निघत नसल्याने शेती सातत्याने तोट्यात जात आहे. त्यातच कृषी विक्रेते शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे व खते मारीत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होत असल्याची ओरड केली जात आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे व खतविक्रेते सक्रिय झाले आहेत. शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून विक्री केली जात आहे.

गेल्या वर्षी तीन व यंदा दोन, असे ‘केपीआर सिंगल सुपर फॉस्फेट कंपनी’च्या खतांचे पाच नमुने फेल निघाल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

यंदा नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वी ‘केपीआर’ खतांची विक्री झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कागदोपत्री वेगळे व प्रत्यक्षात वेगळेच चित्र असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अशाप्रकारे अन्य कंपन्यांनीदेखील फायदा लाटल्याची शंका शेतकरी उपस्थित करीत आहे.

गेल्यावर्षी तीन व यंदा दोन असे एकूण पाच केपीआर सिंगल सुपर फॉस्फेट कंपनीच्या खतांचे नमुने फेल निघाले आहेत. त्यामुळे ५०० बॅगांचा साठा ‘होल्ड’ केला आहे. संबंधित कंपनीचा परवाना रद्द असल्याने खतविक्रीचा प्रश्‍नच उद्भवत नाही. या खताच्या विक्रीवर बंदीच टाकण्यात आली आहे.
- प्रमोद लहाळे, जिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT