Fertilizer Stock : परभणीत खरिपासाठी खतांचा २ हजारांवर बफर स्टॉक करणार

Fertilizer Market : आजवर युरिया १ हजार १९० टन व डीएपी ८०० टन मिळून एकूण २ हजार ९० टन खताचा संरक्षित साठा करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Fertilizer stock
Fertilizer stockAgrowon
Published on: 
Updated on: 

Parbhani News : जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामासाठी युरिया खताचा १ हजार २९० टन व डीएपी खताचा १ हजार ८० टन असा दोन्ही मिळून २ हजार ३७० टन खताचा बफर स्टॉक (संरक्षित साठा) करण्याचा लक्ष्यांक आहे. आजवर युरिया १ हजार १९० टन व डीएपी ८०० टन मिळून एकूण २ हजार ९० टन खताचा संरक्षित साठा करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Fertilizer stock
Fertilizer Shop : हिंगोली जिल्ह्यात पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

परभणी जिल्ह्यात विविध ग्रेडच्या खतांचा सरासरी वापर ७३ हजार २०० टन आहे. यंदाच्या खरिपासाठी १ लाख ६४ हजार १५० टन खतांची मागणी करण्यात आली होती. कृषी आयुक्तालयाकडून १ लाख २० हजार ४६० टन खतसाठा मंजूर झाला आहेत. त्यात युरिया ३३ हजार ४९० टन, सुपर फॉस्फेट १६ हजार ३०० टन, पोटॅश ४ हजार ३४० टन, डीएपी १९ हजार ७४० टन, संयुक्त खते (एनपीके) ४६ हजार ५९० टन या खतांचा समावेश आहे. जून महिन्यात ६१ हजार ४३४ टन खतसाठा मंजूर आहे.

Fertilizer stock
Fertilizer Selling : निविष्ठांची जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा

त्यात युरिया १७ हजार ८० टन, सुपर स्फॉस्फेट ८ हजार ३१३ टन पोटॅश २ हजार २१३ टन, डीएपी १० हजार ६७ टन, एनपीके २३ हजार ७६१ टन, खताचा समावेश आहे. ता. ३१ मार्च अखेर विविध ग्रेडचा ५५ हजार५८६ टन खतसाठा शिल्लक होता. खरीप हंगामासाठी एप्रिल महिन्यापासून आजवर एकूण ३३ हजार ६६५ टन खताचा पुरवठा करण्यात आला. मार्च अखेरचा शिल्लक व एप्रिलपासून पुरवठा करण्यात आलेला मिळून एकूण ८९ हजार २५१ टन खतसाठा शिल्लक होता.

रविवार (ता. १८) पर्यंत एकूण २१ हजार ३४९ टन खतांची विक्री झाली. त्यानंतर ६७ हजार ९०२ टन खते शिल्लक होती. त्यात युरिया १२ जार ३०४ टन, सुपर फॉस्फेट ११ हजार ८०६ टन, पोटॅश १३१ टन, डीएपी ११ हजार ६३० टन, एनपीके ३२ हजार २२ टन खताचा समावेश आहे. बफर स्ट़ॉकमधून आजवर वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे २ हजार ९० टन खतसाठा शिल्लक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com