Ethanol  Agrowon
ताज्या बातम्या

Ethanol Production : इथेनॉलसाठी केंद्राला पंचसूत्री उपाय सादर

Ethanol Industry : इथेनॉलसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करूनदेखील भारतीय तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) अपेक्षित इथेनॉल पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Team Agrowon

Pune News : इथेनॉलसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करूनदेखील भारतीय तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) अपेक्षित इथेनॉल पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे देशातील इथेनॉल उत्पादकांनी केंद्राला एक पंचसूत्री धोरणाचा मसुदा पाठविला आहे. मात्र, या पंचसुत्रीवर केंद्राने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे साखर उद्योगाचे म्हणणे आहे.

मळीपासून सध्या ५५० कोटी लिटर इथेनॉल मिळते आहे. २०२६ पर्यंत ही निर्मिती क्षमता ७६० कोटी लिटरच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट निश्चित कऱण्यात आले आहे. पण, मळीचा अपेक्षित पुरवठा होत नसल्यामुळे इथेनॉल मिश्रण कार्यक्रम प्रभावीपणे पुढे जात नसल्याचे दिसून आले आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २०२२-२३ च्या हंगामात देशातील ऊस उत्पादकता २० ते २५ टक्क्यांनी घटली होती. त्यामुळे २०० लाख टनाने गाळप कमी झाले. परिणामी इथेनॉल निर्मितीसाठी लागणारी मळीदेखील कमी उत्पादित झाली. याच दरम्यान कर्नाटक व महाराष्ट्रातून ११.५२ लाख टन मळी विदेशात विकली गेली. तसेच, १८ कोटी लिटर अतिरिक्त न्यूट्रल अल्कोहोलदेखील जगाच्या बाजारपेठेत विकण्यात आले. त्यामुळे इथेनॉल निर्मिती आणखी घटली.

केंद्राने इथेनॉल निर्मितीच्या कच्च्या मालाकडे म्हणजेच मळीच्या पुरवठ्याकडे लक्ष दिले असते तर किमान ५० कोटी लिटर जादा इथेनॉल तयार करता आले असते, असे देशातील आसवनी प्रकल्पचालकांनी केंद्र सरकारला दिलेल्या एका पत्रात म्हटले आहे.

मळीचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे केंद्राला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम प्रभावीपणे पुढे नेता येत नाही. त्यासाठी पाच मुद्यांवर धोरणात्मक निर्णय घ्यावा, असा आग्रह इथेनॉल पुरवठादारांनी धरला आहे.

पंचसूत्री अशी...

- देशातील अल्कोहोल आधारित रासायनिक उत्पादने तयार करण्यासाठी साखर कारखान्यांमधील अल्कोहोल न वापरता विदेशातील आयात होणारे सिंथेटिक एसडीएस वापरण्याची सक्ती करावी. सर्व इथेनॉल व अल्कोहोल फक्त इथेनॉल उत्पादनासाठीच वापरावे

- उसाच्या मळीपासून रेक्टिफाइड स्पिरीट व एएनए तयार करण्यापेक्षा ते धान्यापासून मिळवण्याचे बंधन घालावे

- देशी मळी व अल्कोहोल निर्यातीवरील कर तातडीने वाढवावा

आयात डिनेचर स्पिरिटवरील आयात कर त्वरित हटवावा

- देशातील इथेनॉलचा पुरवठा वाढविण्यासाठी अल्कोहोल, इथेनॉल, मळी आणि साखर पाक (सिरप) याची साठवण क्षमता वाढवावी

थोडक्यात महत्त्वाचे...

- ‘ओएमसी’ला अपेक्षित पुरवठा होईना

- मळीच्या अपेक्षित पुरवठ्याअभावी इथेनॉल मिश्रण कार्यक्रम पुढे जाण्यात अडचणी

- पंचसुत्रीवर केंद्राचा अद्याप कोणताही निर्णय नाही, असे साखर उद्योगाचे म्हणणे

देशाचा साखर उद्योग आणि इथेनॉल निर्मिती धोरण अशा दोन्ही बाजूंना बळकट करणारे उपाय केंद्राला योजावे लागतील. मळी पुरवठा वाढीसाठी इथेनॉल उद्योगाकडून उपाययोजना केंद्राला सादर केल्या आहेत. मात्र, त्याबाबत कोणताही प्रतिसाद अद्याप तरी दिलेला नाही.
- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, साखर संघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणीला आली गती

Ethanol Industry: राज्यात जितका उपयोग तितकेच इथेनॉल खरेदी

Parth Pawar Land Controversy: चौकशी समितीच्या अहवालात सर्व तथ्ये समोर येतील : पवार

Cotton Production: खानदेशात एक लाख कापूसगाठींचे उत्पादन

Soybean Rate: मध्य प्रदेशात सोयाबीनला १३०० रुपये भाव फरक

SCROLL FOR NEXT