Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात परतीचा पाऊस घेईना उसंत

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यात परतीचा पाऊस (Marathwada Rain Update) उसंत घेत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासात बीड जिल्ह्यात पावसाचा जोर (Rain Intensity) अधिक होता. बीड मधील सहा तर जालना, लातूरमधील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. या ठिकाणी काढणीला व वेचणीला आलेल्या पिकाची चांगलीच दयनीय अवस्था झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यातील आठ मंडळात हलका, पैठण गंगापूरमधील सर्व मंडळात हलका, मध्यम, वैजापूर व कन्नड मधील सर्व मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री तालुक्यात पावसाने उसंत घेतली. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, जालना या तीनही तालुक्यातील जवळपास २१ मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला.

परतूरमधील परतूर मंडळात अतिवृष्टी झाली. तालुक्यातील पाच पैकी चार मंडळात पावसाची हजेरी लागली. बीड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील सर्व तालुक्यात पावसाची हजेरी लागली. औसा तालुक्यातील सर्व आठ, औसामधील आठ, अहमदपूरमधील सहा मंडळात हलका, मध्यम पाऊस झाला. निलंगा तालुक्यातील दहा पैकी नऊ मंडळात हजेरी लावणारा पाऊस उदगीरमधील सर्व ९ मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला.

चाकूर तालुक्यात तुरळक, हलका रेनापुरमधील सर्व पाच मंडळात हलका, मध्यम, देवणी तालुक्यातील सर्व मंडळात तुरळक, हलका,शिरूर अनंतमाळ मधील दोन्ही मंडळात तुरळक तर जळकोट तालुक्यातील दोन्ही मंडळात हलका पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील सर्व आठ, तुळजापूर मधील सात मंडळात हलका-मध्यम पाऊस झाला. परंडा तालुक्यातील पाच पैकी तीन मंडळात तुरळक हलका पाऊस नोंदला गेला. भूममधील पाच पैकी तीन मंडळात हलका ते मध्यम पाऊस झाला.

अतिवृष्टीची मंडळ

(पाऊस मिलीमीटरमध्ये)

जालना जिल्हा

परतूर ६५.७५

बीड जिल्हा

चौसाळा ७०.५०

पाटोदा ६६

आष्टी ६६.५०

अंबाजोगाई ६५.२५

लोखंडी सावरगाव ७१.७५

धारूर ६५.७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT