Fish Market Agrowon
ताज्या बातम्या

Fish Market : आवक वाढल्याने सागरी माशांचे दरात घट ; २० ते २५ टक्के दर घसरले

पोषक वातावरण आणि आवकेत झालेली वाढ यामुळे सागरी माशांचे दर कमी झाले आहेत.

Team Agrowon

Fish Market Update :पोषक वातावरण आणि आवकेत झालेली वाढ यामुळे सागरी माशांचे दर (Marine Fish Rate) कमी झाले आहेत. थंड हवामानामुळे मच्छिमारांच्या जाळ्यात मासळी सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. परिणामी माशांचे दर (Fish Market Rate) चढे असल्याचे चित्र होते.

मात्र, आता मासेमारीसाठी पोषक वातावरण असल्याने मच्छिमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. सध्या बाजारात माशांची उपलब्धता चांगली असल्याने माशांचे दर जवळपास २० ते २५ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

माशांचे दर आवक्यात आल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ होत आहे. पापलेट, सुरमई या सारख्या खवय्यांच्या पंसतीच्या माशांचे दरही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत माशांच्या दर २० ते २५ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

महिनाभरापूर्वी एक हजार ते एक हजार ४०० रुपयांना मिळणारे पापलेट, सुरमई, रावस ही मासळी आता ८०० ते १००० रुपयांना मिळत आहे. दरम्यान, बाजारात आवक वाढल्यामुळे दर कमी झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

माशांचे दर आत्ताचे आणि पूर्वीचे

आवक वाढल्यामुळे माशांचे दर वाढले असले तरी, गेल्या महिन्यात माशांचे दर जास्त होते. बोंबील माशांसाठी आधि प्रतिकिलो ४०० रुपये मोजावे लागत होते. तर तोच दर आता ३०० रुपये प्रतिकिलो झाला आहे. मध्यम आकाराच्या पापलेटचे दर महिनाभरापूर्वी १००० ते १२०० रुपये प्रतिकिलो, तर, तेच दर आता प्रतिकिलो ८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

याशिवाय हॉटेलसाठी लागणारा मोठ्या आकाराच्या पापलेट १००० हजार रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. यासाठी आधि प्रतिकिलोला १२०० ते १४०० रुपये मोजावे लागत होते. तर ८०० ते १००० रुपये प्रतिकिलोला मिळणाऱ्या सुरमई मासळीचे दर ५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 2026 Update: 'पीएम किसान'साठी फार्मर आयडी, ई-केवायसी बंधनकारक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Natural Farming: जालना जिल्ह्यात २७०० हेक्टरवर नैसर्गिक शेती

Dr. Madhav Gadgil: निसर्ग रक्षणाचा द्रष्टा मार्गदर्शक!

Natural Farming: नैसर्गिक शेती की संसाधनांचे केंद्रीकरण

Sanitary Pads: सॅनिटरी पॅडमध्ये शेवग्याचा वापर ठरेल गुणकारी

SCROLL FOR NEXT