Fish Farming
Fish FarmingAgrowon

Mangur Fish : मांगूर मत्‍स्‍य उत्‍पादकांवर कारवाई

तालुक्यातील मांगुर तलावासाठी नदीतून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या उत्पादकांवर पाटबंधारे विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Khalapur News : तालुक्यातील मांगुर (Mangur Fish) तलावासाठी नदीतून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या उत्पादकांवर पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणी उपशासाठी वापरण्यात येणारे पंप जप्तीची कारवाई मंगळवारी महड, हाळ भागात करण्यात आली.

तालुक्यात बेकायदा सुरू असलेल्या मांगुर मत्स्यपालनाविषयी (Fish Farming) वाढत्या तक्रारीची दखल अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पद्मश्री बैनाडे यांनी घेतल्यानंतर कारवाईला वेग आला आहे. साहायक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी कारवाईचे सत्र चालू आहे.

Fish Farming
Smart Fish Parlor Scheme : मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी स्मार्ट फिश पार्लर योजना

मांगुर मत्स्यपालन पातळगंगा नदी किनारी मोठ्या प्रमाणात होत असून तलावासाठी नदीतील पाण्याचा भरमसाठ उपसा होत असल्याने पाटबंधारे विभागाने कारवाई सुरू केली आहे.

मंगळवारी महड, हाळ भागात कर्जतमधील पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता भरत गुंटूरकर, संदेश मेंगाल, महादू सुपे, राम वाघ, बंडू चव्हाण, हनुमंत कालेकर, तहसील खालापूर विभागाकडून तलाठी सुवर्णा चव्हाण, हवालदार एम. जी. सिरतार, महावितरणचे अमोल कदम यांच्या संयुक्त पथकाने नदीपात्रात सोडलेले पंप जप्त केले.

या पंपासाठी केलेल्‍या वीज जोडणीची तपासत असून महावितरणकडून कारवाई करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com