Integrated Farming Agrowon
ताज्या बातम्या

Integrated Farming : एकात्मिक शेती पद्धतीतून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी पशू संवर्धनातून एकात्मिक शेती पद्धतीचा विकास करणे आज काळाची गरज असल्याचे मत जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केले.

टीम ॲग्रोवन

जालना : शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य (Financial Stability) मिळविण्यासाठी पशू संवर्धनातून (Animal Husbandry) एकात्मिक शेती (Integrated Farming) पद्धतीचा विकास करणे आज काळाची गरज असल्याचे मत जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, जालना आयोजित ‘एकात्मिक शेती पद्धतीत पशुधनाचे महत्त्व’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन मंगळवारी (ता. २०) विस्तार कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने व निवृत्त कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षणाचे जिल्ह्यातील पशू संवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या विस्तार कर्मचाऱ्यांकरिता कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे आयोजन करण्यात आले होते.

श्री. सोनुने म्हणाले, की एकात्मिक शेती पद्धतीमध्ये शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कोंबडीपालन, रेशीम उद्योग, फळभाज्या लागवड व फुलशेती इत्यादी व्यावसायिक पिकांचा अंतर्भाव केल्यास त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल. पशू संवर्धनाची एकात्मिक शेती पद्धतीमध्ये महत्त्व असून, आज शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब व मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी पशुसंगोपन काळाची गरज असल्याचे जालना कृषी विभागाचे निवृत्त कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड यांनी या विषयावर उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणामध्ये एकात्मिक शेती पद्धतीची कृषी विज्ञान केंद्राद्वारे विकसित केलेली विविध एकात्मिक शेती पद्धतीची मॉडेल्स या विषयी पशू वैद्यकशास्त्राचे विषय विशेषज्ञ डॉ. एच. एम. आगे यांनी सविस्तर माहिती सांगितली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT