Ujani Dam  Agrowon
ताज्या बातम्या

Ujani Dam : उजनी धरण अखेर शंभर टक्के भरले

यंदा पावसाने महिनाभराने उशिरा हजेरी लावली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरण उणे पातळीतच होते. पण जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण (Ujani Dam) पुण्याकडील वरच्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या विसर्गामुळे (Water Discharge From Dam) शुक्रवारी (ता.१२) सकाळी नऊच्या सुमारास शंभर टक्के भरले. जिल्ह्यातील काही भागांत आजही पावसाचे प्रमाण कमी-अधिक आहे. पण धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा लाभ धरण भरण्यासाठी झाला. या पाण्याचा सोलापूरसह पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतीसह सुमारे सव्वाशेहून अधिक गावांच्या पाणी पुरवठा योजनांना (Water Supply Scheme) फायदा होतो.

यंदा पावसाने महिनाभराने उशिरा हजेरी लावली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरण उणे पातळीतच होते. पण जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यात मात्र अनेक भागांत कमी-अधिक पाऊस आहे. पण धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणाकडून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर उजनीने शंभर टक्केची पातळी गाठली. गुरुवारी रात्री धरणात दौंडकडून सुमारे ४६ हजार ९३२ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाण्याच्या याच सातत्यामुळे पाणीपातळीत वाढ होत गेली. गुरुवारी (ता. ११) रात्री धरणाची पाणीपातळी ९८ टक्क्यांवर स्थिरावली होती. त्यामुळे कोणत्याही क्षणी धरण शंभर टक्केची पातळी गाठणार होते. त्यानंतर रात्रीतच पाणीपातळी दोन टक्क्यांनी वधारली आणि शुक्रवारी (ता.१२) सकाळी नऊच्या सुमारास धरणाची पातळी अखेरीस १००.५६ टक्क्यांवर पोहोचली.

शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

गतवर्षी पाच ऑक्टोबरला धरणाने शंभर टक्क्यांची पातळी गाठली होती. यंदा तब्बल ५६ दिवस आधीच धरणाने शंभरी गाठली आहे. यंदा अवघ्या महिनाभरातच धरण भरले. सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील इंदापूर, नगर जिल्ह्यातील कर्जत या भागातील शेतीसह सुमारे सव्वाशेहून अधिक पिण्याच्या पाणी योजना या पाण्यावर अवलंबून असतात. धरण आता शंभर टक्के भरल्याने या भागातील पाण्याची चिंता मिटली आहे.

पाणीसाठा १००.५६ टक्क्यांवर

शुक्रवारी (ता.१२) सकाळी नऊच्या सुमारास धरणाची एकूण पाणी पातळी ४९६.८५५ मीटरवर पोहोचली. त्यात एकूण पाणीसाठा ११७.५३ टीएमसी एवढा झाला. त्यापैकी उपयुक्त साठा ५३.८७ टीएमसी, तर पाण्याची टक्केवारी १००.५६ टक्क्यांपर्यंत पोहोचली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT