eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Shasan Aplyadari : जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजनेतील पात्र हजारो लाभार्थ्यांचे मानधन केवळ ई-केवायसी प्रक्रियेअभावी थांबले आहे.
E-KYC
E-KYCAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजनेतील पात्र हजारो लाभार्थ्यांचे मानधन केवळ ई-केवायसी प्रक्रियेअभावी थांबले आहे. ही बाब आपल्या निदर्शनास आल्यानंतर लाभार्थींच्या घरापर्यंत पोहोचून ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिले होते.

त्यानुसार प्रशासनाने शासन आपल्या दारी उपक्रम हाती घेत लाभार्थींच्या घरी जाऊन ई - केवायसी प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. आठवड्यात दीड हजार लाभार्थींची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ई-केवायसी प्रक्रिया करावयाचे प्रलंबित राहिलेल्या ९,३३७ लाभार्थ्यांपैकी आजपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून १,४३१ लाभार्थी यांची त्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

E-KYC
Compensation E-KYC Error : अतिवृष्टीच्या मदत यादीत नावांच्या भाषांतरामुळे गोंधळ

ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी पुढे येऊन यात सहभागी व्हावे आणि गरज पडल्यास ग्रामसेवक, तलाठी, महसूल कर्मचारी व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा. ते थेट आपल्या घरापर्यंत येऊन ई-केवायसी करून देतील.

ई-केवायसी करावयाचे बाकी राहिलेल्या उर्वरित सर्व लाभार्थी यांची ई-केवायसी पूर्ण होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या या योजनांचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अडचणीत असलेल्या आणि सामाजिक आधारापासून वंचित घटकांना मदत करणे हा आहे.

E-KYC
Ration Card e-KYC : ई-केवायसीबाबत उदासीनता

या योजनांतर्गत निराधार पुरुष आणि महिला, अपंग, गंभीर आजारांनी त्रस्त नागरिक, अनाथ, विधवा तसेच ६५ वर्षांवरील वृद्ध नागरिकांना दरमहा ठरावीक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे ४१ हजार २३० लाभार्थी आहेत,

त्यापैकी आठ हजार ९७ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. तसेच श्रावणबाळ योजनेचे ५१ हजार ६०४ लाभार्थी असून, त्यात एक हजार २४० लाभार्थी ई-केवायसी न झाल्यामुळे वंचित आहेत. ई-केवायसी न झाल्यास लाभार्थ्यांचे मानधन थांबते, यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com