karmala APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Karmala APMC Election : करमाळा बाजार समितीची निवडणूक अखेर बिनविरोध

Team Agrowon

Solapur News : करमाळा बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. २६) प्रहार संघटना आणि भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रमुख नेते मंडळींकडून प्रयत्न सुरू होते.

परंतु प्रहार आणि भाजपच्या उमेदवारांमुळे त्यात अडचण येत होती, पण अखेरीस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात नेत्यांना यश आले आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक बिनविरोध झाली.

बाजार समितीच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी पाटील गटाचे माजी सभापती शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी करत बागल गटात जाऊन सभापतिपद मिळविले होते.

त्यामुळे जगताप गटाची सत्ता गेली होती. त्या वेळी मोठा वाद झाला होता. त्यातून जयवंतराव जगताप आणि त्यांच्या मुलांवरही गुन्हे दाखल झाले होते. या तीनही नेत्यांमध्ये तेव्हापासून धुसफूस होती. त्यामुळे या निवडणुकीत हे जगताप-पाटील-बागल गट एकत्र येतील का, ही शंका होती.

त्यातच आमदार संजय शिंदे यांनीही त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरविले होते. परंतु त्यांनी जयवंतराव जगताप यांच्याशी चर्चेनंतर माघार घेतली. त्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यात लक्ष घातले. त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप, नारायण पाटील, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांना एकत्र आणत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले.

दोन-तीन बैठकांही या नेत्यांमध्ये झाल्या. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर होती. परंतु प्रहार आणि भाजपच्या काही नेत्यांमुळे त्यात पुन्हा अडचण निर्माण झाली.

पण त्यांनाही समजावून सांगण्यात या सर्व नेत्यांना यश आले आणि उमेदवारी मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या क्षणाला त्यांनीही माघार घेतली आणि करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ही निवडणूक बिनविरोध झाली.

नवे संचालक मंडळ

जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, जनार्दन नलावडे, महादेव कामटे, तात्यासाहेब शिंदे, रामदास गुंडगिरे, सागर दौंड, शिवाजी राखुंडे, नागनाथ लकडे, शैलजा मेहेर, साधना पवार, नवनाथ झोळ, काशिनाथ काकडे, बाळू पवार, कुलदीप पाटील, परेशकुमार दोशी, मनोजकुमार पितळे, वालचंद रोडगे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT