Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : माॅन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान

माॅन्सूनच्या परतीचा प्रवास आजही थांबला होता. माॅन्सूनच्या परतीची सीमा कैलाशहर, बेरहामपूर, कानके, विलासपूर, ब्रम्हपुरी, बुलडाणा, डहाणून या भागात कायम आहे.

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्याच्या काही भागात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. दुसरीकडं माॅन्सूनने (Monsoon) आजही परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) केला नाही. तर हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली.

माॅन्सूनच्या परतीचा प्रवास आजही थांबला होता. माॅन्सूनच्या परतीची सीमा कैलाशहर, बेरहामपूर, कानके, विलासपूर, ब्रम्हपुरी, बुलडाणा, डहाणून या भागात कायम आहे. दोन दिवसांत माॅन्सून विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा आणि संपूर्ण पश्चिम बंगालच्या काही भागातून माॅन्सून परतण्यास पुरक स्थिती निर्माण होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात मंडळात पावसानं दाणदाण उडाली. उस्मानाबाद मंडळात ९० मिलिमीटर पाऊस झाला. तसचं कळंब मंडळात ४०, परांडा ४० लोहारा ४० आणि तुळजापूर मंडळात ४० मिलिमीटर पाऊस झाला. तर जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद मंडळात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसचं औरंगाबाद, लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या.

विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. लोणार मंडळात ५० मिलिमीटर तर देऊळगाव राजा ४० सिंदखेड राजा ४० आणि चिखळी मंडळात ३० मिलिमीटर पावसानं हेजरी लावली. तर वाशीम, अकोला, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, नगर, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. सातारा जिल्ह्यातील पाडेगाव मंडळात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सांगली जिल्ह्यातील जत येथे ४० आणि पुणे जिल्ह्यातील भोर येथे ३० मिलिमीटर पाऊस पडला. कोकणातील कणकवली येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुलदे येथे ८० तर दोडामार्ग येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला. हवामान विभागानं संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT