Mango Crop Agrowon
ताज्या बातम्या

Mango Season : मोहराच्या प्रतीक्षेत असलेल्या आंबा कलमांना पोषक वातावरण

थंडीमुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. मोहर येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आंबा कलमांना पोषक स्थिती निर्माण झाली आहे; मात्र बदलत्या वातावरणामुळे यंदा हंगाम एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत लांबणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Team Agrowon

रत्नागिरी ः जिल्ह्यात थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. गुरुवारी (ता. १२) दापोलीत ९.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पारा (Temperature) घसरल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना हुडहुडी भरली आहे.

अनेक ठिकाणी पावसाप्रमाणे दव पडू लागले असून घाटामध्ये धुके पसरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या थंडीमुळे आंबा (Mango) बागायतदार सुखावले आहेत.

मोहर येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आंबा कलमांना पोषक स्थिती निर्माण झाली आहे; मात्र बदलत्या वातावरणामुळे यंदा हंगाम एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत लांबणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

थंडी वाढल्यामुळे गेले आठ दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पुण्यात तापमान १० अंशाच्या खाली आले आहे.

आणखी काही दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. थंडी वाढू लागल्याने जिल्ह्यातील आंबा, काजू हंगामाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक ठिकाणी मोहरातून कैरी दिसू लागली असून काजूलाही फळधारणा झाली आहे. अपेक्षित थंडी नसल्यामुळे यंदा पालवी आलेल्या झाडांना मोहर फुटलेला नव्हता.

आतापर्यंत जिल्ह्यात १५ ते २० टक्केच मोहर कलमांना आलेला आहे. गेले आठ दिवस पडलेल्या थंडीमुळे मोहर फुटण्याची अपेक्षा वाढली आहे.

पालवी येऊन १२० दिवस झाले आहेत. यामधून प्रत्यक्ष उत्पादन येण्यासाठी एप्रिल महिना उजाडेल. सलग तिसऱ्या वर्षी मार्च महिन्यात आंबा उत्पादन कमी राहणार आहे.

सध्या जिल्ह्यात दिवसभर कडाक्याचे ऊन पडत असले तरी मध्येच जोरदार बोचरा वाराही आहे. त्यामुळे थंडीही जाणवते. जिल्ह्यातील आंबा, कशेडी, परशुराम घाटासह दापोली, मंडणगड, संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड धुके पडत आहे. त्यामुळे समोरचे काही दिसत नसल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

शुक्रवारी पहाटे पावसासारखे दव पडत होते. यामुळे कडधान्य पिकाला फायदा होणार आहे. जिल्ह्यात संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर आदी ठिकाणी पावटा, कुळीथ, चवळी आणि पालेभाजीचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी हे हवामान चांगले असून पीक तरारले आहे.

बदलत्या वातावरणामुळे अनेक झाडांना मोहर आलेला नाही. आता थंडी सुरू झाल्यामुळे मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होईल; मात्र आंबा मोठ्या प्रमाणात येण्यासाठी उशीर होईल.
देवेंद्र झापडेकर, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Jeevan Mission : वीज जोडणीअभावी रखडले जलजीवन मिशन योजनेचे काम

Sugarcane Damage : आडव्या उसासाठी हवी मदत

Rain Crop Damage : नाशिक विभागात ८ लाख शेतकऱ्यांचे नुकसान

Farmer Relief : आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार मदत करा

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

SCROLL FOR NEXT