
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात या हंगामातील नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद झाली असून जिल्ह्यात थंडीचा (Clod Weather) कडाका वाढू लागला आहे. हे वातावरण फळबागांसाठी (Mango Orchard) पोषक असल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांमध्येदेखील काहीसे उत्साहाचे वातावरण आहे.
जिल्ह्यात यावर्षी परतीचा पाऊस लांबला. साधारणपणे ऑक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभास जिल्ह्यात थंडीला प्रारंभ होतो. परंतु नोव्हेंबरमध्ये एक-दोन दिवसच थंडीची चाहुल लागली; मात्र त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पुन्हा दोन चार दिवस थंडी पडली परंतु मंदोस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीचे प्रमाण कमी झाले.
त्यानंतर थंडीमध्ये सतत चढउतार पाहायला मिळत होता. परंतु अपेक्षित थंडी पडत नव्हती. सोमवारी (त. ९) रात्रीपासून थंडीला सुरुवात झाली.
मंगळवारी (ता. १०) पहाटे कडाक्याची थंडी पडली. दरम्यान १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरच्या अखेरीस तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत आले होते. दरम्यान थंडीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाढलेली थंडी दहा ते बारा दिवस कायम राहिल्यास त्याचा फळबागांसाठी चांगला उपयोग होईल. मोहोर किंवा फळधारणा झालेल्या आंबा, काजू बागांसाठी हे वातावरण पोषक मानले जात आहे. थंडीमुळे थ्रीप्स, तुडतुडा किंवा अन्य कीटक
प्रादुर्भाव कमी होईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे; मात्र थंडीचे प्रमाण आहे त्यापेक्षा कमी होऊन ती जास्त दिवस राहिल्यास मोहोर मोठ्या प्रमाणात येईल परंतु मादी फुलांचे प्रमाण कमी होऊन नर फुलांचे प्रमाण वाढण्याचा धोकादेखील आहे.
आजच्या प्रमाणे पुढील दहा ते बारा दिवस थंडी कायम राहिल्यास त्याचा फळबागांवर चांगला परिणाम होईल. आंब्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन बागायतदारांच्या फवारण्या कमी होतील. परंतु आजच्यापेक्षा कमी तापमान अधिक दिवस राहिल्यास झाडांना मोहोर अधिक येईल, परंतु त्यामध्ये नर फुलांचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो.
- डॉ. विजय दामोदर, शास्त्रज्ञ, रामेश्वर संशोधन उपकेंद्र देवगड
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.