Shirsai Irrigation Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : शिरसाईच्या पाण्यासाठी आजपासून उंडवडीत उपोषण

Shirsai Irrigation Scheme : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शिरसाईच्या लाभ क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही.

Team Agrowon

Baramati News : खडकवासला कालव्यातून शिर्सुफळ तलावात पाणी सोडून शिरसाई योजनेद्वारे लाभार्थी गावांत आवर्तन सोडावे, या मागणीसाठी १४ गावांतील शेतकरी आजपासून (ता. २२) उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील श्री. संत तुकाराम महाराज पालखी तळावर चक्री उपोषणाला बसणार आहेत.

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शिरसाईच्या लाभ क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम वायाला गेला असून सद्यःस्थितीला या भागात तीव्र चारा व पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामासाठी शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाला अनेकदा केली आहे. मात्र संबधित विभागाने तीन वेळा वेगवेगळ्या तारखा देऊन शेतकऱ्यांची निराशा केली आहे.

त्यामुळे शेतकरी संतापले असून, वेगवेगळ्या पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष व लाभार्थी शेतकरी आज उपोषणाला बसणार आहेत. चौदा गावांतील शेतकऱ्यांनी शिरसाईच्या पाण्यासाठी चक्री उपोषणाचे हत्यार उपासले आहे. नियोजनाची बैठक (ता. २१) गुरुवारी झाली.

त्यात सर्व नियोजन करण्यात आले आहे. दररोज किमान ५० शेतकरी उपोषणाला बसतील. पाणी सोडणार नाहीत, तोपर्यंत चक्री उपोषण सुरु राहील, अशी माहिती तुकाईमाता पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष मधुकर भोसले यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: थंडीचा कडाका कमीच राहणार; तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढला

Illegal Moneylending: रिसोड तालुक्यात बेकायदा सावकारांविरुद्ध धडक कारवाई

Land Records: जुन्या जमीन दस्तांचे डिजिटायझेशन होणार; ६२ कोटींचा प्रकल्प

Bajra Sowing: बाजरीची पेरणी सुरूच; क्षेत्र किंचित वाढण्याचे संकेत

Local Body Election: अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी शांततेत मतदान

SCROLL FOR NEXT