Sugarcane Bill Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Bill : विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे अंतिम ऊस बिल आज शेतकऱ्यांना मिळणार

FRP : कारखान्याची एफआरपी रक्कम २६५० रुपये आहे. परंतु एफआरपीपेक्षा ५० रुपये प्रति टन जादा दर शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.

Team Agrowon

Solapur News : निमगाव येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडे २०२२ -२३ हंगामात गळितास आलेल्या उसाला प्रतिटन १५० रुपयांचे अंतिम बिल शुक्रवारी (ता. १) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार शिंदे म्हणाले, की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट नंबर एक व करकंब युनिट नंबर दोनमध्ये मागील हंगामात गाळप झालेल्या २३ लाख ९१ हजार टन उसाला प्रतिटन २५५० रुपये दर दिलेला आहे व आता एक सप्टेंबर रोजी प्रतिटन १५० रुपये अंतिम बिल हप्ता देण्यात येत आहे.

कारखान्याची एफआरपी रक्कम २६५० रुपये आहे. परंतु एफआरपीपेक्षा ५० रुपये प्रति टन जादा दर शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत. मागील हंगामात अखेरच्या महिन्यात १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत गळितास आलेल्या उसाला ७५ रुपये प्रति टन जादा, तर एक मार्चपासून हंगाम संपेपर्यंत आलेल्या उसाला प्रति टन १५० रुपये ज्यादा दर दिलेला आहे.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रतिटन २७७५ ते २८५० रुपये दर मिळाला आहे. या वेळी उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे, रमेश पाटील, सुहास पाटील जामगावकर, तुकाराम ढवळे, शंभुराजे मोरे, शिवाजीराव पाटील, प्रमोद कुटे, मोडनिंबचे दत्तात्रय सुर्वे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

‘एफआरपी’पेक्षा ५० रुपये जास्त दर

आगामी हंगामासाठी ऊसतोडणी वाहतुकदारांना दोन लाख रुपये ॲडव्हान्स पेमेंट दिले आहे. शिवाय एक हजार ट्रॅक्टर, एक हजार बैलगाड्या अशा ऊस वाहतूकदारांना ९० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

आगामी गळीत हंगामाची तयारी पूर्ण झालेली असून, या हंगामासाठी ४५ हजार हेक्टर ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध आहे. एफआरपी पेक्षा पन्नास रुपये ज्यादा दर देणारा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना जिल्ह्यातील अव्वल ठरला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT