Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : खरिपातील पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

Kharif Season : यंदा मात्र उद्दिष्टपूर्ती झाली आणि पैशाची उपलब्धता नसल्याचे कारण देत कर्जास नकार देण्यात आला.

Team Agrowon

Yavatmal News : यवतमाळ जिल्हा बॅंकेच्या जवळा शाखेतून दरवर्षी पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यंदा मात्र उद्दिष्टपूर्ती झाली आणि पैशाची उपलब्धता नसल्याचे कारण देत कर्जास नकार देण्यात आला. बॅंकेकडून या प्रकरणी तोडगा न निघाल्यास सोमवार (ता.११) पासून बेमुदत उपोषण करू, असा इशारा आर्णी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

आर्णी तालुक्‍यातील पांगरी, म्हसोला व पहूर या गावातील शेतकऱ्यांनी या बाबत निवेदन दिले आहे. त्यानुसार, हे शेतकरी यवतमाळ जिल्हा बॅंकेच्या जवळा शाखेचे नियमित ग्राहक आहेत. त्यासोबतच जवळा शाखेतूनच आम्हा शेतकऱ्यांना दरवर्षी खरिपात पीक कर्ज उपलब्ध होते.

या कर्जातून शेतीकामांसाठी लागणाऱ्या निविष्ठांची खरेदी, मशागतीसाठी लागणारा पैसा तसेच कुटुंबांच्या गरजांसाठी रकमेची तरतूद होते. मात्र २०२३-२४ या वर्षात बॅंकेकडून मात्र कर्ज पुरवठा करण्यात आला नाही. या प्रश्‍नी वारंवार शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधण्यात आला. परंतु त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी त्रासून मुख्य प्रबंधकांशी संपर्क साधण्यास सांगितले.

बॅंकेच्या या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी या निवेदनाची दखल घेत बॅंकेच्या माध्यमातून तत्काळ कर्ज पुरवठा करावा, अन्यथा सोमवार (ता.११) पासून पांगरी

येथील हनुमान मंदिर परिसरात बेमुदत उपोषण करू, असा इशारा देण्यात आला आहे. आर्णीचे तहसीलदार, ठाणेदार, बॅंकेचे शाखा व्यवस्थापक यांना हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर हरिभाऊ गावंडे, आनंद बारके, पवन सोनवाने, बळिराम राठोड, मुरलीधर अवथेर, संजीव पवार, विनोद राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Hatnur Dam : ...आतापर्यंत केवळ हतनूर सिंचन प्रकल्पातूनच विसर्ग सुरू

Ladki Bahin Yojana : लाखावर ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून राहणार वंचित

e-Peek Pahani : शेतकऱ्यांच्या ई-पीकपाहणीला जळगाव जिल्ह्यात गती

Banana Plantation : उशिराची मृग बहर केळी लागवड सुरू

SCROLL FOR NEXT