Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : बळीराजाचे डोळे आकाशाकडे

Monsoon Rain : गेली काही वर्षांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने पेरणीपूर्व मशागती होऊनही पाऊस वेळेवर न झाल्याने पिकांच्या उत्पन्नात विपरीत परिणाम होतो आहे.

Team Agrowon

Pune News : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील चास, कमान, कान्हेवाडी, वाडा, आव्हाट, डेहणे, भोरगिरी व परिसरात खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागती संपत आल्या असून, बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले असून, जून महिना संपत आला. शिवाय मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले, तर आर्द्रा नक्षत्र सुरू होऊनही पाऊस सुरू होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

गेली काही वर्षांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने पेरणीपूर्व मशागती होऊनही पाऊस वेळेवर न झाल्याने पिकांच्या उत्पन्नात विपरीत परिणाम होतो आहे. ऐन पावसाळ्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या बळीराजाला चालू वर्षी हवामान खात्याकडून व त्याचबरोबर प्रत्यक्षात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे काहीच दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.

खेड तालुक्याचा पश्‍चिम पट्टा हा चास कमान धरणाच्या पाण्याने सुजलाम् सुफलाम् झालेला असला, तरी आजही शेतकरी प्राधान्याने खरीप हंगामात भात, बाजरी, भुईमूग, बटाटे, सोयाबीन यांसह खरिपाच्या पिकांच्या पेरणी वा लागवडी करताना पावसावरच अवलंबून असल्याचा दिसतो.

या वर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस थोड्याफार प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते व त्यामुळे पेरणीपूर्वच मशागतींना वेगाने सुरुवात झाली होती. पेरणीपूर्व मशागतीमध्ये शेतांची नांगरट, सपाटीकरण, शेतांमध्ये खते पांगवणे, खतांची खरेदी तसेच बी बियाण्यांची खरेदी, बांधबंदिस्ती याला प्राधान्य देत दमदारपणे पावसाचे आगमन झाल्यावर लवकरात लवकर पेरण्या करून चांगले उत्पन्न कसे घेता येईल याकडे लक्ष होते;

मात्र जून महिना संपत आला तरी पावसाचे आगमनच नसल्याने बळीराजा धास्तावला असून, अनेक शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेवर भातरोपे तयार केली असून, भातरोपे काही दिवसांत लागवडीसाठी तयार होणार आहेत; मात्र पाऊस कधी होणार याकडे बळीराजा डोळे लावून बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT