Organic Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Organic Inputs : जैविक निविष्ठांच्या वापराकडे कल वाढला

Agriculture Inputs Use : सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यातील चारही कृषी विद्यापिठांना स्वतंत्रपणे सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र देण्यात आले आहे.

Team Agrowon

Akola News : सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यातील चारही कृषी विद्यापिठांना स्वतंत्रपणे सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र देण्यात आले आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्थापन या केंद्रामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.

प्रामुख्याने या केंद्राअंतर्गत स्थापन केलेल्या प्रयोगशाळेत तयार झालेल्या जैविक निविष्ठांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात या प्रयोगशाळेत तयार झालेल्या बायो पेस्टिसाईडची सुमारे १३ लाखांवर विक्री झाली आहे.

सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा ही प्रयोगशाळा एक भाग आहे. शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे वाढवण्यासाठी कृषी खात्याकडून जनजागृती केली जात आहे. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन स्थापन करण्यात आले आहे.

त्याला जोड म्हणून कृषी विद्यापिठांनाही या उपक्रमात सहभागी करून घेत संशोधनाचे काम सुरू झालेले आहे. येथील कृषी विद्यापीठात गेल्या तीन वर्षांपासून जैविक प्रयोगशाळा कार्यरत असून या प्रयोगशाळेत दर्जेदार निविष्ठा तयार केल्या जात असल्याने शेतकऱ्यांची मागणी वाढते आहे.

२०२०-२१ मध्ये या केंद्रात तयार झालेल्या निविष्ठांची चार लाख रुपयांची विक्री झाली होती. त्यानंतर २०२१-२२ मध्ये हा आकडा दुप्पट होऊन ६ लाख ३९ हजारांवर पोहोचला. तर या आर्थिक वर्षात विक्री दुप्पट होत १३ लाख २६ हजारांवर जाऊन पोहोचली.

जैविक शेती मिशनमध्ये जे शेतकरी सेंद्रिय शेतीशी जोडले ते वारंवार कृषी विद्यापिठातील या केंद्रात येतात. आमच्याकडील उत्पादनांचा परिणाम अत्यंत चांगला असल्याने शेतकरी वारंवार येऊन ही उत्पादने नेत आहेत. अनेक शेतकऱ्यांचा आत्मविश्वास या शेतीत वाढतो आहे. यासाठी लागणाऱ्या निविष्ठा त्यांच्या उपयोगी पडत आहेत. कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पाच हेक्टरमध्ये विविध पिकांचा प्रयोग आम्ही करीत असून तो पाहून शेतकरी आपल्या शेतात प्रयोग करीत आहेत. ही समाधानाची बाब मानली पाहिजे.
- डॉ. आदिनाथ पसलावार, प्रमुख शास्त्रज्ञ, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डॉ. पंदेकृवि, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT