Tractor Agrowon
ताज्या बातम्या

Free Tractor: शेतकरी पुत्र राबवतोय ‘ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे’

शेतकऱ्यांना मदत म्हणून भरोसा (ता. चिखली) येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीकृष्ण थुट्टे यांनी सरकारी यंत्रणांची मदतीची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

अॅग्रोवन वृत्तसेवा

अकोलाः हवामान बदलाच्या (climate Change) स्थितीत शेतीत अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यंदा बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत म्हणून भरोसा (ता. चिखली) येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीकृष्ण थुट्टे यांनी सरकारी यंत्रणांची मदतीची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

‘ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे,’ अशा प्रकारची मोहीम हातात घेत त्यांनी शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत सुरू केली आहे. यंदा बऱ्याच ठिकाणी मृग नक्षत्र पावसाअभावी कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला (Kharip Sowing) सुरुवात करावी लागली.

शेतकऱ्यांनी पेरणीयंत्राच्या साह्याने सोयाबीनची (Soybean) पेरणी केली. परंतु या भागात अचानक मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पेरलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांवर मातीचा थर जमा झाला. यामुळे ते सोयाबीन (Soybean Seed) बियाणे उगवलेच नाही. या कारणामुळे आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले.

अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज (Crop Loan) माफीचा लाभ मिळाला नसल्यामुळे त्यांनी उसनवारी करून, घरातील धनधान्य विकून पेरणी केली. आता बँक तर पीककर्ज देत नाही. अशातच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. त्यामुळे खते, बी-बियाणे बाजारातून कशी खरेदी करावे, हा प्रश्‍न आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी थुट्टे यांनी आपले ट्रॅक्टर दुबार पेरणीसाठी उपलब्ध करून दिले आहे. ‘मातृतीर्थ जैविक शेती मिशन फार्मर प्रोड्यूसर’ कंपनीचे सदस्य स्वप्नील साखरे, संदीप थुट्टे यांनी श्रीकृष्ण यांचे कौतुक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Drought : चारा अनुदानासह ११६ टीएमसी पाण्यासाठी सांगोल्यात उपोषण

Sugarcane Crisis : उसाला प्रति टन ५००० रुपयांची पहिली उचल देण्याची ऊस उत्पादकांची मागणी

Shabari Naturals Packaging : आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा डंका! ‘शबरी नॅचरल्स’च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन अवॉर्ड’

Water Conservation : अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी उपाय करा

Millet Processing : भरडधान्य प्रक्रियेतून मूल्यवर्धनाला संधी

SCROLL FOR NEXT