Farmer Protest in Kolhapur Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Protest : पाण्यासाठी शेतकऱ्यांचे मुदाळतिट्टा येथे आंदोलन

पुलाचे बांधकाम सुरू करताना संबंधित विभागाने पाण्याचे व वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे होते.

Team Agrowon

बिद्री, जि. कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाच्या (Dam) उजव्या कालव्याला गेले वीस दिवस पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Crop Loss) होत आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत.

अन्य शेतीकामे खोळंबली आहेत. त्यामुळे तत्काळ पाणी सोडावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Help) मिळावी, या मागणीसाठी बोरवडे, बिद्री, उंदरवाडी परिसरातील शेतकऱ्यांतर्फे मुदाळतिट्टा येथे बांधकाम सुरू असलेल्या पुलावरच निषेध आंदोलन करण्यात आले.

माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे या वेळी म्हणाले, ‘‘पुलाचे बांधकाम सुरू करताना संबंधित विभागाने पाण्याचे व वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे होते."

"शेतकऱ्यांनी कष्टाने घाम गाळून हजारो रुपये मशागत, बि-बियाण्यांवर खर्च केले आहेत. पाण्याअभावी हा खर्च वाया गेला आहे. कॅनॉलला (Canal) लवकरात लवकर पाणी सोडावे, अन्यथा मुदाळतिट्टा येथे मोठे जनआंदोलन उभा केले जाईल.’’

या आंदोलनात सरपंच पांडुरंग चौगले, उपसरपंच आनंदा पाटील, बोरवडेचे उपसरपंच विनोद वारके, मारुती पाटील, राजेंद्र चौगले, तानाजी साठे, के. के. फराकटे, बाळासाहेब बलुगडे, अण्णासो पोवार, बाळासाहेब फराकटे, दत्तात्रेय पाटील, निवृत्ती साठे, जोतिराम साठे, स्वप्नील फराकटे, दत्तात्रेय चांदेकर, राजेंद्र जाधव, निवास चव्हाण, अमोल गुरव, शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT