Soybean Sowing Agrowon
ताज्या बातम्या

BBF Technique : शेतकऱ्यांची टोकन, ‘बीबीएफ’ला पसंती

Kharif Sowing : कमी बियाणे दरात अधिक उत्पादकतेचा उद्देश साध्य होत असल्याने पारशिवणी तालुक्‍यातील करंभाड परिसरातील शेतकऱ्यांचा टोकन आणि बीबीएफद्वारे सोयाबीन लागवडीकडे कल वाढीस लागला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : कमी बियाणे दरात अधिक उत्पादकतेचा उद्देश साध्य होत असल्याने पारशिवणी तालुक्‍यातील करंभाड परिसरातील शेतकऱ्यांचा टोकन आणि बीबीएफद्वारे सोयाबीन लागवडीकडे कल वाढीस लागला आहे.

या वर्षी या दोन्ही पद्धतींनुसार लागवडीखालील क्षेत्र ८० एकरांवर पोहोचले आहे. कृषी विभागाकडून देखील याला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा सोयबीनचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. मात्र उत्पादकता वाढल्यास उत्पादन खर्च काही अंशी कमी करणे शक्‍य होत उत्पन्नात वाढ होते. हाच विचार कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये रुजविण्यावर भर दिला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, पारशिवणीचे तालुका कृषी अधिकारी डॉ. एस. आर. शेंडे, कृषी पर्यवेक्षक पी. सी. झेलगोंदे, कृषी पर्यवेक्षक जे. बी. भालेराव, कृषी सहायक अविनाश ढोले, कृषिमित्र सुधीर धुंडे यांनी त्याकरिता पुढाकार घेत गेल्या वर्षीपासून व्यापक मोहीम राबविली.

गेल्या हंगामात अधिक पावसाच्या काळात सरीतून पाणी वाहून गेल्याने या भागातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या तुलनेत चांगली उत्पादकता झाली. त्याच अनुभवातून यंदा शेतकऱ्यांनी स्वतःच टोकन आणि बीबीएफ पद्धतीचा अवलंब केला आहे.

टोकन पद्धतीत ३ फूट रुंद आकाराचा बेड, दोन बियांत ४५ सेंटिमीटर ठेवण्यात येते. या पद्धतीत एकरी ५ ते ६ किलो बियाण्यांची गरज भासते. याउलट पारंपरिक लागवड पद्धतीत हेच प्रमाण एकरी ३२ ते ३५ किलोपर्यंत राहते. परिणामी, बियाण्यांवरील खर्च कमी होतो.

टोकन केल्यामुळे दोन रोपात अंतर अधिक परिणामी हवा खेळती राहत असल्याने शेंगधारणा देखील अधिक होते, असे करंभाडचे शेतकरी सांगतात. त्यासोबतच बीबीएफ यंत्राच्या साह्याने देखील या भागात लागवड केली जात आहे. करंभाड येथील गुणेश भक्‍ते यांनी गेल्या वर्षी बीबएफ संयंत्राचा वापर करून सोयाबीन लावले होते.

त्या वेळी चांगली उत्पादकता आणि पिकाचा दर्जाही चांगला राहिला. परिणामी, त्यांनी यंदा त्यांनी बीबीएफवरील सोयाबीन लागवड क्षेत्र ७ एकरांपर्यंत नेले आहे. गावातील इतर शेतकऱ्यांचा देखील असाच अनुभव असल्याने टोकन पद्धतीने आणि बीबीएफ यंत्राचा वापर करून लागवड झालेले क्षेत्र प्रत्येकी ४० प्रमाणे ८० एकरापर्यंत पोहोचले आहे.

पूर्वी सोयाबीन उत्पादकता सहा क्‍विंटलपर्यंत कमी होती. बीबीएफमुळे एकरी १५ क्‍विंटलची उत्पादकता मिळत आहे. सोबतच इतरही अनेक फायदे या लागवड पद्धतीत आहेत.
- गुणेश भक्‍ते, शेतकरी, करंभाड, जि. नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rainfall 2025: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज; विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

AI In Sugarcane Farming : ‘एआय’च्या वापरासाठी ऊस उत्पादक शेतकरी आले पुढे

Sugarcane Farming : ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे

Pasha Patel: शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घेतली पाहिजे; पाशा पटेल यांचा अजब सल्ला

Dairy Farming : दुग्ध व प्रक्रिया व्यवसायातून शोधला आनंद

SCROLL FOR NEXT