Kharif Sowing : सांगलीत खरिपाच्या ५३ टक्के पेरण्या

Kharif Season : जिल्ह्यात पावसाची दडी, उघडझाप याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीवर झाला आहे. जिल्ह्याचे निम्मे क्षेत्र पेरणीविना आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात पावसाची दडी, उघडझाप याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीवर झाला आहे. जिल्ह्याचे निम्मे क्षेत्र पेरणीविना आहे. आतापर्यंत १ लाख ३५ हजार ७४३ हेक्टरवर पेरा झाला आहे. हे प्रमाण ५३ टक्के असून गेल्यावर्षीच्या तुनलेत यंदा क्षेत्रात अंदाजे ३४ टक्के घट होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिरा झाल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. परिणामी शेतकरी विवंचनेत होता. परंतु ज्या भागात शाश्वत पाण्याची सोय होती, त्याठिकाणी आगाप सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या पिके जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत होता.

Kharif Sowing
Kharif Sowing : खरीप पेरा ९३ टक्क्यांवर

दरम्यान, जुलैमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पेरण्यांना गती आली. जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ८३ हजार २५३ हेक्टरवर पेरा झाला होता. जिल्ह्यात सर्वदूर पुरेसा पाऊस झाल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेरणी ५२ हजार ४९० हेक्टरने वाढून ती १ लाख ३५ हजार ७४३ हेक्टरपर्यंत पोहोचली.

यंदा ३४ टक्के घटीची शक्यता

गत आठवड्यात झालेल्या हलक्या पावसामुळे कडधान्य, ज्वारी, बाजरी या पिकांची पेरणी झाली. पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिकांची अपेक्षित वाढ होत आहे. काही ठिकाणी अजूनही पेरण्या होत आहेत. मिरज, जत, आटपाडी, कडेगाव, तासगाव, कवठे महांकाळ, खानापूर तालुक्यांत पेरण्यांमध्ये ३४ टक्के घटीची ची शक्यता आहे.

Kharif Sowing
Soybean Sowing : मराठवाड्यात सोयाबीनचा २४.६६ लाख हेक्टरवर पेरा

Sज्वारीचे क्षेत्र घटले

जिल्ह्यात आतापर्यंत भात पिकाची ८७ टक्के, ज्वारी २४ टक्के, बाजरी ५४ टक्के, मका ६६ टक्के, तूर ५२ टक्के, उडीद ३४ टक्के, मुग १७ टक्के सोयाबीन ५०टक्के आणि भुईमूग ६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ हजार ९७० हेक्टर असून ६ हजार ४७९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वास्तविक उन्हाळी पावसाची दडी आणि मॉन्सून पाऊस लांबणीवर गेल्याने खरीप हंगामातील ज्वारीचे क्षेत्र घटले आहे.

पीकनिहाय झालेल्या पेरण्यांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक क्षेत्र

भात १२ हजार ५४८

ज्वारी ६ हजार ४७९

बाजरी २९ हजार ५३८

मका २६ हजार ९२४

तूर ५ हजार ८५१

मूग १ हजार ३२०

उडीद ५ हजार १८३

भुईमूग २२ हजार ४५५

सोयाबीन २१ हजार 7७६४

एकूण १ लाख ३५ हजार ७४३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com