Kesar Mango | Mango Keshar Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Kesar Mango : पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा केशर आंबा होणार निर्यात

पेठ हा आदिवासी बहुल तालुक्यात पारंपरिक तालुक्यात फलोत्पादन क्षेत्र विस्तारत असताना शेतकरी केशर आंबा लागवडीकडे वळले आहेत. येथे जवळपास ७५० हेक्टर बागा आहेत.

टीम ॲग्रोवन

नाशिक : पेठ हा आदिवासी बहुल तालुक्यात पारंपरिक तालुक्यात फलोत्पादन (Horticulture) क्षेत्र विस्तारत असताना शेतकरी केशर आंबा (Kesar Mango) लागवडीकडे वळले आहेत. येथे जवळपास ७५० हेक्टर बागा आहेत. कृषी विभाग (Agriculture Department) या तालुक्यात दरवर्षी ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवड योजना राबवितो. गुणवत्तापूर्ण उत्पादन, चव यामुळे आंब्याला मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आंब्याची निर्यातवाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा केशर आंबा निर्यात होणार आहे.

नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नाशिक उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयात ‘हॉर्टसॅप’ योजने अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रिय शेती विभागाचे तज्ज्ञ डॉ. आशुतोष धोंडे यांनी शेतकऱ्यांना ‘निर्यातक्षम आंबा उत्पादन आणि सेंद्रिय आंबा उत्पादन’ या विषयी मार्गदर्शन केले. अविनाश खैरनार म्हणाले, ‘‘पेठ तालुक्यातील हवामान केशर आंबा उत्पादनास पोषक आहे. शेतकऱ्यांनी आंबा निर्यात करण्यासाठी ‘अपेडा’च्या ‘मँगोनेट’ प्रणालीवर नोंदणी करावी.’’

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टोचे यांनी पेठ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केशर आंबा निर्यातीकडे वळावे, असे आवाहन केले. प्रगतिशील शेतकरी महेश टोपले यांनी शेतकऱ्यांना आंबा उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याची सूचना केली. वनराज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष यशवंत गावंडे यांनी शेतकऱ्यांनी आंबा, भात, नागली, वरई ही पिके सेंद्रिय पद्धतीने उत्पादन तसेच एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्याबाबत माहिती दिली.

‘परदेशातून प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांना मागणी’

‘‘सेंद्रिय पद्धतीने आंब्याच्या उत्पादनासाठी निविष्ठा घरगुती पातळीवर शक्य आहे. इएम, दशपर्णी, अमील, वेमिल, देशी केल्प, खेकडा, फळ असे अर्क, ह्युमिक व फुलविक अर्क द्रावण, वेस्ट डिकंपोझर द्रावण अशा निविष्ठा घरगुती बनविणे शक्य आहे. त्यांचा वापर करून आंब्याचे पोषण, रोग व कीड नियंत्रण करणे शक्य आहे. याशिवाय शेणखत, गांडूळ खत, निंबोळी पेंड यांचा वापर करून खत व्यवस्थापनातून आंबा उत्पादनात गुणवत्तापूर्ण वाढ शक्य आहे. परदेशात प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांना मागणी आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मागणी ओळखून मालाचा पुरवठा करण्याची संधी आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावेत,’’ असा सल्ला डॉ. आशुतोष धोंडे दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT