Water Bund Agrowon
ताज्या बातम्या

Water Bund Work : यादववाडी मधील बंधाऱ्याच्या कामावर शेतकऱ्यांचा आक्षेप

Rural Development : यादववाडी (ता. पुरंदर) येथे रूद्रगंगा नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामावर स्थानिक ग्रामस्थ व लाभार्थी शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : यादववाडी (ता. पुरंदर) येथे रूद्रगंगा नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामावर स्थानिक ग्रामस्थ व लाभार्थी शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे काम तातडीने थांबवण्याची मागणी केली असून, या कामाची चौकशी करून गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून या कामाची पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून छोटे पाटबंधारे विभागांतर्गत ३५ लाख रुपये किमतीचा साठवण बंधारा बांधण्यात आला आहे. त्याच्या सिमेंट कॉंक्रीटचे काम २८ मे रोजी पूर्ण झाले होते. त्या कामावर पाणी साठवण्यासाठी करण्यात येणारी सिमेंट आळी दहा दिवस उलटले तरी अद्याप केली नसून, संपूर्ण बंधाऱ्याला तडे गेले आहेत.

स्थानिक ग्रामस्थ व लाभार्थी शेतकऱ्यांनी या कामाच्या ठेकेदाराला वारंवार सांगूनही त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

छोटे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने या कामात काळाबाजार सुरू आहे. ओढ्याच्या खोलीपासून फक्त दोन फूट उंचीचा हा बंधारा तयार केला आहे.

त्यामुळे या बंधाऱ्याची पाणी साठवणक्षमता कमी झाली असून, शासनाने एवढा निधी खर्च करूनदेखील त्या बंधाऱ्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी गुलाब थोपटे, प्रभाकर यादव, सतीश यादव, अमित यादव, नीलेश यादव, निखिल यादव, प्रशांत यादव आदी शेतकरी उपस्थित होते.

बंधाऱ्यावर कॉंक्रीट काम झाले असून, या काळात पाणी साठवण्यासाठी आळी करण्यास उशीर झाला होता. ठेकेदार या कामावर वारंवार पाणी मारत असून, उन्हाच्या तडाख्याने या बंधाऱ्याला तडे गेले आहेत. सिमेंटचे प्रमाण जास्त झाल्याने हा प्रकार घडला आहे.
- अमोल अंबटवार, शाखा अभियंता
बंधाऱ्याची उंची वाढल्यास ओढ्याकाठच्या शेत जमिनींना धोका निर्माण होण्याची शक्यता असून, या कामाची तातडीने पाहणी करून योग्य कारवाई करण्यात येणार आहे. -
ओंकार शेरकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT