Dhule Water News
Dhule Water NewsAgrowon

Dhule Water News : धुळे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व जलस्रोतांची तपासणी

Water source : यंदाच्या मॉन्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे.
Published on

Dhule Water News : यंदाच्या मॉन्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील दोन हजार ८३७ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. ३० जून २०२३ पर्यंत हे अभियान पूर्ण करायचे आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणी ३० जूनपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे.

Dhule Water News
पाणीपुरवठा योजनांसाठी तातडीने जलस्त्रोत शोधा

याअंतर्गत पाणी गुणवत्तेच्या पोर्टलवर पाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळजोडणी असलेली कुटुंबे आदी स्रोतांचे पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी गोळा करून पाणी नमुने गुणवत्ता पोर्टलवर यूआयडी काढूनच संबंधित उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करायचे आहेत. सदर पाणी गुणवत्ता तपासणी अभियानासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी हे या संनियंत्रण करत आहेत.

तालुकानिहाय उद्दिष्ट असे

धुळे.............५९०

साक्री..........१०६६

शिरपूर...........७७२

शिंदखेडा.........४०९

एकूण...........२८३७

Dhule Water News
Farmers Protest : हमीभावासाठी शेतकरी आक्रमक ; दिल्ली-चंदीगड महामार्ग रोखला

सक्रिय सहभागाचे आवाहन

या अभियानात ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व संबंधित यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बुवनेश्‍वरी एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. ए. बोटे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक प्रदीप पवार यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com