Soybean Seeds Agrowon
ताज्या बातम्या

Seed Market : बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची लूट

Bogus Seed : यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे घेताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

Team Agrowon

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे घेताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या वर्षी कृषी विभागाकडून बियाण्यांची कमतरता भासणार नाही असे सांगत असताना जिल्ह्यात शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे खरेदीत लूट होत आहे.

खरीप हंगामात या वर्षी साडेचार लाख हेक्टरवर कपाशी लागवडीचे नियोजन केले आहे. अशातच कपाशीचे नामांकित बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात गेलेल्या शेतकऱ्यांना लिंकिंगचा बोजा सहन करावा लागत आहे. ८५३ रुपये किमतीचे कपाशीचे पाकीट १२०० ते १६००, तर खास वाणाचे बियाणे एक पाकीट २६०० रुपयांपर्यंत विकत घ्यावे लागत आहे.

इतकेच नव्हे तर इतर अतिरिक्त दुसऱ्या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहे. यंदा शेतकऱ्यांची पसंती काही खास वाणांच्या बियाण्यांना आहे. मात्र या बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. हे बियाणे कंपन्यांकडून उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे बियाणे हवे असल्यास शेतकऱ्यांना नको असलेले इतर बियाणेदेखील नाइलाजाने घ्यावे लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षी अतिपाऊस आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक कोंडी झालेला शेतकरी या हंगामात बियाणे व खते खरेदी करताना होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीमुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्या कृषी केंद्रावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यासाठीच कृषी विभाग आहे. किती बियाणे उपलब्ध आहे याची नोंद ठेवली जात आहे. कुठेही बियाणे तुटवडा नाही. जर बियाणे तुटवडा असल्याचे सांगितले जात असेल तर शेतकऱ्यांनी संपर्क करावा.
-प्रमोद लव्हाळे, कृषी अधीक्षक, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT