Bogus Seed and Fertilizer : बोगस बियाणे खते, विक्री केल्यास गुन्हे दाखल करा

Kharif Season : खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत.
Bogus Seed
Bogus SeedAgrowon
Published on
Updated on

Sangli News : खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत. बियाण्यांची कमतरता पडू नये यासाठी उत्पादक कंपन्यांकडून याची दक्षता घेऊन बोगस बियाणे, खते विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक झाली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा निविष्ठा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील, कृषी विकास अधिकारी धनाजी पाटील, मोहीम अधिकारी स्वप्नील माने, पोलीस निरीक्षक सतीष कदम, विक्रेते प्रतिनिधी ललितकुमार दबडे, अमित शहा, संजय निलावार आदी उपस्थित होते.

Bogus Seed
Bogus Seed Update : बोगस बियाणे, खते विक्रेत्यांवर कारवाई करा

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, की सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढत आहे. त्यामध्येही बोगस खते विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात यावेत.

निविष्ठांची विक्री जादा दराने होऊ नये. शेतकऱ्याना बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

बैठकीत कृषी विकास अधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी आवश्यक बियाण्यांची मागणी सादर केली. खासगी कंपन्यांकडून १२ हजार ५७१ क्विंटल तर ‘महाबीज’कडून ८ हजार ३८० क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

सोयाबीन बियाणे ११ हजार ६६८ क्विंटल मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी युरीया, डीएपी, एनपीके आदी सुमारे १ लाख ८९ हजार ३५४ टन रासायनिक खतांची मागणी केली असून १ लाख ३८ हजार ०९७ टन खतसाठा मंजूर झाला आहे.

खरीप २०२३ साठी युरीयाचा १४५० टन व डीएपीचा ७९८ टन बफर खत-साठा करण्याबाबतच्या सूचना आयुक्तालय स्तरावरून दिलेल्या आहेत. त्यानुसार युरीयचा ४५३ टन, डीएपीचा ६९७ टन बफर साठा केला असून रेकनुसार उर्वरित खतसाठ्याचा बफर साठा करण्याचे नियोजन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com