Seed, Fertilizer Update : खते, बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

Kharif Season Update : नाशिक जिल्हा खतांच्या वापरामध्ये राज्यात आघाडीवर असल्याने खरिपात मोठ्या प्रमाणात खतांची गरज असल्याने मागणीदेखील अधिक करावी लागते.
Seed, Fertilizer Update
Seed, Fertilizer UpdateAgrowon
Published on
Updated on

Nashik News : बिपॉरजॉय चक्रीवादळ आणि एल निनोच्या परिणामांमुळे मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जूनच्या सुरुवातीला पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी यंदा चिंतेत आहेत. जिल्ह्यात यंदा खरिपात खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा झाला आहे.

मात्र, पाऊस लांबल्याने खतांची उचल झालेली नाही. तर, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीकडे सपशेल पाठ फिरविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध गोदामे, दुकाने आदी ठिकाणी मिळून तब्बल एक लाख टन खते पडून आहेत.

नाशिक जिल्हा खतांच्या वापरामध्ये राज्यात आघाडीवर असल्याने खरिपात मोठ्या प्रमाणात खतांची गरज असल्याने मागणीदेखील अधिक करावी लागते. त्यादृष्टिने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खरीप हंगामासाठी निश्चित केलेल्या ६ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रासाठी २ लाख ५८ हजार टन खतांची मागणी नोंदविली होती.

यापैकी २ लाख २८ हजार ८६० टन खत साठा मंजूर झाला आहे. गतवर्षीचा ९९ हजार ९३८ टन खतसाठा शिल्लक असून जून अखेर १ लाख ५३ हजार ८३९ टन प्राप्त झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ८८६ टन खतसाठा उपलब्ध आहे. मात्र, जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे.

Seed, Fertilizer Update
Kharif Season : जुन्नरमध्ये खते, बियाण्यांची उलाढाल ठप्प

जून महिना अर्धा होऊनही देखील मॉन्सूनच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावलेली नाही. पावसाने ओढ दिलेली असल्याने बाजारात खतांची हवी तशी उचल झाली नाही. जिल्ह्यात दर महिन्याला खतांचा सुरळीत व हवा तेवढा किंवा लक्ष्यांकानुसार पुरवठा खत कंपन्यांनी केला. मात्र, मागणीअभावी खते पडून आहेत.

जिल्ह्यात युरिया, संयुक्त खते, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश अशी सर्वच खते कमी अधिक प्रमाणात पडून आहेत. डीएपी अधिक प्रमाणात पडून असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे मिळाली.

खतसाठा पडून असताना दुसरीकडे बियाणे खरेदीसाठी देखील शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार १ लाख ५ हजार १७४ क्विटंल बियाणे मंजूर झाली आहेत. यापैकी ८२ हजार ७७१ क्विंटल बियाणांचा पुरवठा झाला आहे. यात बाजारात केवळ १ हजार ७९९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली झाली आहे.

खरीप हंगामासाठी लागणारे खतसाठा व बियाणे याचा पुरवठा झाला आहे. खते व बियाणे विक्रेत्यांची बैठक घेतली असता यात, खते व बियाणे यांना उचल नसल्याचे, विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. पाऊस आणखी लांबणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पाऊस लांबल्यावर आपत्कालीन पीक नियोजन देखील कृषी विभागाने करून ठेवले आहे.
कैलास शिरसाठ, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com