Cotton Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Harvesting : शेतकऱ्यांनी जाणले शास्त्रोक्त कापूस वेचणीचे तंत्रज्ञान

स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत दर्जेदार कापूस उत्पादनासाठी सावनेर तालुका कृषी विभागाच्या वतीने कापूस वेचणीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सावनेर व खापा मंडळातील शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

Team Agrowon

नागपूर : स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत दर्जेदार कापूस उत्पादनासाठी (Cotton Production) सावनेर तालुका कृषी विभागाच्या वतीने कापूस वेचणीपूर्व (Cotton Harvesting) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सावनेर व खापा मंडळातील शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

खापा मंडळातील भेंडाळा, भानेगाव, इसापूर, नंदापूर, गडेगाव आणि सावनेर मंडळातील मानेगाव, कुसुंबी, कोदेगाव, पंढरी, कवठा, उमरी, सावळी सिल्लोरी या गावांमध्ये कापूस वेचणीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक कापसाच्या उत्पादन, मार्केटिंगबाबत माहिती देण्यात आली. कापसाच्या गुणवत्तेचे गुणधर्म धाग्याची लांबी, मजबुती, परिपक्वता, रंग, जिनिंगसाठी आवश्यक असलेली ओलाव्याची टक्केवारी व कचरा या सर्व बाबींचा कापसाच्या बाजार मूल्यांवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

याशिवाय कापूस पिकावरील लाल्या, कृषी विभागातील महाडीबीटी व इतर योजनांच्या बाबत सांगण्यात आले. ड्रोनद्वारे कपाशी पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कापूस वेचण्यासाठी वापरावयाच्या बॅगचे वाटप यावेळी करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी शुभांगी राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या उपक्रमात सावनेर मंडळातील गावांमध्ये मंडळ अधिकारी अभिलाषी येरमे, पर्यवेक्षक हरिचंद्र मानकर, कृषी सहाय्यक ईश्वर घोडमारे, कृषी सेवक तेजल बनसोड, मंगल वाघमारे, तर खापा मंडळात कृषी पर्यवेक्षक रोशन डंबरे, कृषी सहायक अनिल खरपपुरे, पूजा इंगळे, मीनल वैद्य हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Best Cooperative Bank: पीडीसीसी बँकेला ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कार

Gram Panchayat Administration: शिरूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक

Agriculture Department Structure: आकृतिबंध रद्दच्या घोषणेनंतरही कृषी विभागात संघर्ष कायम

Onion Export Market: बांगलादेशची श्रीलंकेत कांदा निर्यातीसाठी चाचपणी

Rainfall Deficit: पावसाच्या खंडाने सोयाबीन शेंगही रिकामी

SCROLL FOR NEXT