Madat GR 2026 : राज्य सरकारने शेती पिकं आणि जमिनीच्या नुकसानीसाठी शासन निर्णय केला प्रसिध्द

Farmer Relief:जून ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक भागात शेती पिकांचं नुकसान झालं होतं. कुठे पिकं पाण्याखाली गेली, तर कुठे शेतजमिनी खरडून गेल्या. या नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकरी वाट पाहत असतानाच राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी २९१ कोटी ९१ लाख रुपयांचा मदत निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या मदतीचा लाभ राज्यातील ३ लाख ४४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण या निधीमध्ये शेतपिकांच्या नुकसानीसाठी किती रक्कम आहे? शेतजमिनीच्या नुकसानीसाठी किती मदत मिळणार? कोणत्या जिल्ह्यांतील शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरणार आहेत? आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी व कशी जमा होणार? जाणून घेऊया आजच्या ॲग्रोवन शोमध्ये.
Loading content, please wait...