Lumpy Skin  Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : लसीनंतरही ‘लम्पी स्कीन’ ने रोज ५० जनावरांचा मृत्यू

नगर जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ११३ जनावरे दगावली

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नगर : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) ने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या कमी होण्यास तयार नाही. आतापर्यंत जवळपास सर्व जनावरांना लसीकरण (Vaccination) केले आहे. तरीही जिल्ह्यात रोज ५० जनावरांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे एक हजार ११३ जनावरांचा मृत्यू झाला असल्याचे पशुसंवर्धन (Animal Husbandary) विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यात साधारण तीन-चार महिन्यांपासून लम्पी स्किनने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे. बुधवारी (ता.२) एका दिवसात सुमारे ५८१ जनावरांना या आजाराची बाधा झाल्याचे दिसून आले. लम्पी स्कीनची जनावरांना होणारी बाधा रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आत्तापर्यंत सुमारे पंधरा लाख जनावरांना लसीकरण केले. मात्र त्यानंतरही बाधित जनावरांची संख्या कमी होत नसल्याची स्थिती आहे. दररोज लम्पी स्कीनमुळे सुमारे ५० पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत प्रादुर्भावग्रस्त जनावरांची संख्या १७  हजार ८५५ झाली आहे. मृतांचा आकडा १ हजार १३३ इतका झाला आहे. जिल्ह्यात १६ लाखांच्या जवळपास गायी, म्हशी आणि बैलांची संख्या आहे. यातील १४ लाख ९८ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गुरुवारी (ता.३) जिल्ह्यातील २१९ गावांत लम्पी स्कीनचा उद्रेक झाला. चार महिन्यांपासून पुढील वयाच्या वासरांना लसीकरण करण्याचे काम सुरू आहे.

पशुसंवर्धन आयुक्तांकडून पाहणी
जिल्ह्यामध्ये जोरदार झालेल्या पावसानंतर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होणाऱ्या आणि त्यातून मृत्यू होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या निदर्शनास आले आहे. पशुसंवर्धन आयुक्तांनी या बाबत पारनेर आणि संगमनेर तालुक्यात जाऊन निरीक्षण केले आहे. सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत असले, तरी जनावरांचे मृत्यू होत असल्याने पशुपालक हतबल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Organic Fertilizer : भरडधान्याच्या उत्पादकतेत जैविक निविष्ठांचे मोठे योगदान ः तायडे

Raju Shetti: चालू हंगामात उसाला प्रतिटन ३,७५१ रूपये विनाकपात पहिली उचल मिळावी, राजू शेट्टींनी कारखानदारांना दिली १० नोव्हेंबरची डेडलाईन

Ice-Cream Business : अल्पभूधारक शेतकऱ्याने उभारला आइस्क्रीम उद्योग

Irrigation Project: विदर्भ व तापी खोऱ्यातील सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करा; गिरीश महाजनांचे आदेश

Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित

SCROLL FOR NEXT