Weather Station Agrowon
ताज्या बातम्या

Weather Station : शेतकऱ्यांनी पर्जन्यमापक यंत्राला घातला पुष्पहार

येथील पर्जन्यमापक यंत्र मागील अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने ते पावसाची अचूक नोंद करत नाही. म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयालगत असलेल्या पर्जन्यमापक यंत्रणा पुष्पहार घालून गांधीगिरीने सोमवारी (ता.१२) आपला रोष व्यक्त केला.

टीम ॲग्रोवन

ईट, जि. उस्मानाबाद : येथील पर्जन्यमापक यंत्र (Rain Gauge) मागील अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने ते पावसाची अचूक नोंद (Rain Data) करत नाही. म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयालगत असलेल्या पर्जन्यमापक यंत्रणा (Rain Gauge System) पुष्पहार घालून गांधीगिरीने सोमवारी (ता.१२) आपला रोष व्यक्त केला.

सोमवारी सकाळी १० वाजता बँड पथकासह वाजत गाजत जाऊन गांधीगिरी पद्धतीने हे आंदोलन केले. या वर्षीच्या पावसाळ्यात तीन ते चार वेळा ईट मंडळात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडलेला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या यंत्रणेने अंदाजे काहीही अकडे दाखवून ईट मंडळातील १२००० ते १३००० हजार शेतकऱ्यांना विमा व अनुदानापासून वंचीत ठेवल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

सतत पडणाऱ्या पावसाचे चुकीचे आकडे दाखवल्यामुळे ईट मंडळातील १९ गावातील शेतकरी या वर्षीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या आंदोलनामध्ये केशव चव्हाण, संदीपान कोकाटे, अनंत डोके, प्रसाद सातपुते, रामराजे देशमुख, संपत देशमुख, संजय हुंबे यांनी सहभाग नोंदविला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Import Issues: खाद्यतेलाप्रमाणेच कडधान्यांतही सरकारचे आत्मघातकी धोरण

Water Levels Drop: जळगाव जिल्ह्यातील धरणे निम्म्यावर

Onion Seed Damage: कांदा बीजोत्पादनाला फटका

Delhi Politics: अमर्याद महत्त्वाकांक्षा आणि संयमाचा अभाव

Agriculture Development Department: तालुका कृषी कार्यालयांना नवे संगणक

SCROLL FOR NEXT