Crop Loan agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : यवतमाळमध्ये शेतकरी कर्जापासून वंचित ; ठाकरे गटाचे आंदोलन

Farmer loan : यवतमाळ सात हजारांवर शेतकरी कर्जापासून वंचित असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Yavatmal news : उद्दिष्ट संपल्याने अतिरिक्‍त पीककर्ज वाटपासाठी निधी नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेने कर्जवाटप थांबविले. याचा विरोध म्हणून शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी बॅंकेवर हल्लाबोल करीत बॅंकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सोमवारी (ता. २४) जाब विचारला.

यवतमाळ जिल्हा बॅंकेकडून यंदाच्या खरिपात १०० टक्‍के कर्ज वितरणाचा दावा करण्यात आला आहे. उद्दिष्टानुसार हे कर्जवाटप करण्यात आले. आता पीककर्ज वाटपासाठी निधी नसल्याने कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. बॅंकेच्या या भूमिकेविषयी संशय व्यक्‍त केला जात असून कर्ज वितरण न करण्यामागे बॅंक अडचणीत असल्याच्या कारणाची चर्चा होत आहे. परिणामी बॅंक वाचविण्याकरिता बॅंकेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.

बॅंकेच्या ७ हजार ३२६ शेतकऱ्यांनी कर्ज भरल्यानंतरही त्यांना नवीन कर्ज देण्यात आले नाही. याउलट त्यांना अन्य राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले जात आहे. हे सारे संशयास्पद असल्याने जिल्हा बॅंकेने नियमित कर्जदारांना आपल्यास्तरावरच कर्ज द्यावे, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांकडून घरातील दागिने व इतर साहित्य गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. या सर्वांचा विरोध म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून बॅंकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. बॅंकेचा खर्च कमी करण्यासाठी संचालकांच्या वाहनांवर बंदी घाला, अशा सूचना करण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT