Dhananjay munde Agrowon
ताज्या बातम्या

Dhananjay Munde : शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कृषिमंत्र्यांशी शाब्दिक वाद

Agriculture Minister : स्वाभिमानी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे चांगले कोंडीत सापडले.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ ः स्वाभिमानी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे चांगले कोंडीत सापडले. त्यांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांना हळू आवाजात बोलण्याचा सल्ला दिला. मात्र शुक्रवारी (ता.१८) या दोघांमध्ये शाब्दिक वाद रंगल्याचे अनेकांनी अनुभवले.

कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी (ता. १८) शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने पुसद दौऱ्यावर होते. कार्यक्रम संपल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी त्यांना यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १७ दिवसांत १७ आत्महत्या, तर क्राइम रेकॉर्डनुसार ८४ दिवसांत १६० आत्महत्या झाल्याचे सांगितले. परिणामी, यवतमाळला कृषी योजनांच्या संदर्भाने विशेष दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली.

मात्र त्यांच्या या प्रश्‍नामुळे गोंधळलेल्या कृषिमंत्र्यांनी या प्रश्‍नाचे उत्तर न देता जाधव यांनाच हळू आवाजात बोलण्याचा सल्ला दिला. यवतमाळच्या पाच तालुक्‍यांत जलसंधारणासाठी एक चौरस फूटही क्षेत्र नाही. उलट या भागात चोपण (चिबड) जमिनीसाठी उपाययोजना राबवाव्या लागतील, असे एक सर्वेक्षण सांगते, असा मुद्दा शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी उपस्थित केला. त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या मुद्द्यावर लवकरच एक बैठक घेणार असून या बैठकीला आपणासही निमंत्रित केले जाईल, असे सांगून वेळ मारून नेली. परिणामी, निर्माण झालेला तणावही निवळला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT