Farmers Protest Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Market : ‘नाफेड’मार्फत टोमॅटो खरेदीचा शेतकरी संघटनेकडून निषेध

Tomato Rate : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मे व जून महिन्यात मातीमोल दर मिळाल्याने मोठे नुकसान सोसले. मात्र त्यानंतर तोडणी महाग झाल्याने लागवडी उपटून टाकल्या.

Team Agrowon

Nashik News : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मे व जून महिन्यात मातीमोल दर मिळाल्याने मोठे नुकसान सोसले. मात्र त्यानंतर तोडणी महाग झाल्याने लागवडी उपटून टाकल्या. परिणामी जुलैमध्ये आवक घटल्याने दरात तेजी आहे. मात्र शेतकरी अडचणीत असताना दुर्लक्ष करणारे सरकारने आता ग्राहकांचा विचार केला.

शहरी ग्राहकांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने स्वस्त दरात टोमॅटो उपलब्ध करून देण्यासाठी १५ जुलैपासून ‘नाफेड’मार्फत टोमॅटो खरेदी करून तो विकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत रविवारी (ता. १६) सटाणा तालुका शेतकरी संघटनेने संताप व्यक्त केला. संघटनेतर्फे मुंजवाड येथे फलक लावून केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदवला.

संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी सांगितले, की गेली दोन-तीन वर्षे कोणत्याही शेतमालाला भाव नाही. कधी टोमॅटोचा लाल चिखल होतो तर कधी कांद्याची नासाडी होते. तरीही सरकार शेतकऱ्यांची दखल घेत नाही. जणू काही सरकारने शेतकऱ्यांना व एकूणच त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या महिन्यात टोमॅटोचे विक्रमी उत्पादन वाढले म्हणून दोन रुपये किलो मातीमोल दराने विक्री करणे किंवा रस्त्यावर फेकून देणे भाग पडले. मात्र टोमॅटोचे बऱ्यापैकी दर वधारल्यानंतर केंद्र सरकारने लगेच ‘नाफेड’मार्फत खरेदी करून ग्राहकांना स्वस्त दरात विकण्याची घोषणा केली. यावरून सरकारचे दुटप्पी धोरण लक्षात येते.

बागलाण तालुका शेतकरी संघटनेतर्फे फलक लावून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी, वैभव अहिरे, भास्कर बागूल, भिका सूर्यवंशी, उमेश खैरनार, वसंत जाधव, नानाजी जाधव, ज्ञानेश्वर जाधव, घनश्याम जाधव, सोमनाथ जाधव, महेंद्र जाधव, रूपेश जाधव, रमेश जाधव, बाबूराव जाधव, त्र्यंबक जाधव, चेतन पवार, जगदीश आहिरे, विनोद जाधव, चेतन पवार, सुशांत जाधव, गौरव शेवाळे, शिवजी जाधव, कार्तिक जाधव, शरद जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष

शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणून गरिबीच्या खाईत लोटून आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या असंवेदनशील शेतकरीविरोधी सरकारने गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याला व इतर पिके मातीमोल भावाने विकली जात असताना जाणूनबुजून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले.

आता टोमॅटोचे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागताच २४ तासांत ‘नाफेड’मार्फत खरेदी करण्याचा व ग्राहकांना स्वस्त दरात पुरविण्याचा निर्णय घेतला, अशा आशय फलकाच्या माध्यमातून मांडला आहे. यासह घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT