Tomato Market : टोमॅटो उत्पादक खरच मालामाल होतोय का?

Tomato Rate Maharashtra : टोमॅटो उत्पादक मालामाल झाले की नाही हे ठरवण्यासाठी वर्षभराचा आढावा घ्यावा लागेल.
Tomato
TomatoAgrowon
Published on
Updated on

Pune News : सध्या भाजीपाला बाजार आणि माध्यमांमध्ये चर्चा आहे ती टोमॅटोच्या वाढलेल्या भावाची. अगदी पंधरा दिवसांपूर्वी ५ रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो अचानक ५० रुपयांवर गेला.

तर किरकोळ बाजारात दराने १५० रुपयांचा टप्पा गाठला. मग लगेच सरकार, माध्यम आणि मार्केटमध्ये टोमॅटो महागल्याने सामान्यांचे कंबरडे कसे मोडले, ग्राहकांचे अर्थकारण कसे कोलमडले याची अर्थशास्त्रीय चर्चा सुरू झाली.

टोमॅटो उत्पादक मालामाल, टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती या मथळ्याखाली बातम्या फिरू लागल्या. आजही टोमॅटो महागच आहे. पण वर्षभरातील टोमॅटो हंगामांचा विचार करता शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.

टोमॅटो उत्पादक मालामाल झाले की नाही हे ठरवण्यासाठी वर्षभराचा आढावा घ्यावा लागेल. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या हंगामात एक किलो टोमॅटोला १० ते १५ रुपये भाव मिळाला. तर दुसऱ्या हंगामातील भाव ५ ते १० रुपये होता.

दुसरीकडे एक किलो टोमॅटोचा उत्पादन खर्च सरासरी १३ रुपयांपर्यंत येतो. बाजारात नेऊन विकेपर्यंतचा खर्च पकडल्यास म्हणजेच टोमॅटो बाजारात नेऊन विकेपर्यंत किलोला १६ ते १७ रुपये खर्च येतो. म्हणजेच मागील दोन्ही हंगामात शेतकरी पुरते तोट्यात आले.

Tomato
Tomato Market: टोमॅटो उत्पादक खरच मालामाल झाला का? देशभरात टोमॅटो शंभरी पार!

आधीचे दोन्ही हंगाम तोट्यात गेल्याने लागवड कमी झाली, असे बीड जिल्ह्यातील धुंकवाड येथील शेतकरी राहुल यादव यांनी सांगितले. टोमॅटोचे राज्यात मोठे क्षेत्र आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. चालू हंगामात २० जूननंतर टोमॅटो दरात अचानक वाढ झाली.

बाजारातील आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते सांगत आहेत. एप्रिलपासून वातावरणात मोठे बदल झाले. बहुतांश भागांत उष्णतेची लाट होती. याचा फटका भीजापाला पिकांसह टोमॅटो पिकालाही फटका बसला. जूनमध्ये पावसाने पाठ फिरवली.

याचा चालू हंगामातील उत्पादकतेवर परिणाम झाला. वर्षात अनेक शेतकरी टोमॅटोचे तीन हंगाम घेतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पण पहिले दोन हंगाम तोट्यातच गेले. त्यामुळे तिसऱ्या हंगामात लागवडी घटल्या, असे नगर जिल्ह्यातील सारोळा अडवाई येथील शेतकरी बी. एन. फंड यांनी सांगितले.

आधीच्या दोन हंगामांमध्ये टोमॅटोला चांगला भाव नव्हता. त्यामुळे हरियाना, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटोऐवजी बिन्सला पसंती दिली होती. तसच बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात, राजस्थान आणि इतर काही भागातील टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. या सर्व घटकांमुळे बाजारतील आवक २० जूननंतर कमी झाली. यामुळे टोमॅटो दरात मोठी तेजी आली.

Tomato
Tomato Rate : अत्यल्प आवकेने टोमॅटो दरात तेजी

असे असले तरी एकरी सरासरी उत्पादन आणि तिन्ही हंगामात मिळालेल्या भावाचे गणित केले तर किलोला १७ ते २० रुपये भाव मिळाला. पण हा सरासरी भाव त्याच शेतकऱ्यांचा आहे ज्यांनी चालू हंगामात ५० ते ६० रुपयांनी टोमॅटो विकला. ज्यांनी चालू हंगाम घेतला नाही ते पहिल्या दोन हंगामांमध्ये पुरते देशोधडीला लागले. वर्षभरात टोमॅटो उत्पादकांना मिळलेला भाव आणि उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हाती विशेष काही लागले नाही, हे स्पष्ट आहे.

चालू हंगामात बदलते तापमान, गारपीट, पाऊस, पावसाचा खंड याचा मोठा फटका पिकाला बसला. आधीच्या हंगामात एक एकरात ४ हजार क्रेट माल निघाला होता. चालू हंगामात मात्र ८०० क्रेट मिळतील. उत्पादनात पाच पटीने घट झाली. त्यामुळे सध्या भाव जास्त दिसत असला तरी हाती आलेले उत्पादन आणि उत्पादन खर्चाचा विचार करता हंगाम बरोबरीतच जातो की काय असे वाटते
- राहुल यादव, टोमॅटो उत्पादक, धुंकवाड, जि. नगर.
टोमॅटोचे पहिले दोन हंगाम तोट्यात गेले. चालू हंगामात चांगला भाव मिळत आहे. पण उत्पादनात मोठी घट झाली. तीनही हंगामातील उत्पादन खर्च आणि तीनही हंगामातील सरासरी भाव पाहता बरोबरीच झाली. शेतकऱ्यांना फार काही नफा झाला नाही. आपण चर्चा केवळ सध्याच्या भावाची करतो. अगदी १५ दिवसांपर्यंत टोमॅटोला मातीमोल भाव होता, त्याचा विचार केला तर ही गोष्ट लक्षात येईल.
- बी. एन. फंड, शेतकरी, सारोळा अडवाई, जि. नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com