Summer Soybean Agrowon
ताज्या बातम्या

Summer Soybean : उन्हाळ सोयाबीन पेरणीसही पसंती

खानदेशात उन्हाळ सोयाबीन पेरणीसही यंदा अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पेरणी सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवर स्थिरावले, असे दिसत आहे.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात उन्हाळ सोयाबीन पेरणीसही (Summer Soybean Sowing) यंदा अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पेरणी (Sowing) सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवर स्थिरावले, असे दिसत आहे.

मागील चार वर्षे खरिपात सोयाबीनचे अतिपावसात नुकसान (Crop Damage) झाले आहे. २०२१ च्या खरिपात सोयाबीनचे अतिपावसात पुरते मातेरे झाले होते.

त्यामुळे मागील वेळेस २०२२ च्या रब्बी हंगामात किंवा उन्हाळ हंगामात सोयाबीन उत्पादन (Soybean Production) वाढीवर शासनाने काम सुरू केले.

विविध संस्था, कंपन्यांकडून सोयाबीन बियाण्याचा पुरवठा करून घेतला. त्या वेळेस शासनाच्या या उपक्रमात अनेक शेतकरी सहभागी झाले. पुढे त्यांना एकरी चार ते साडेचार क्विंटल उत्पादन हाती आले.

तसेच दरही पाच हजार रुपये प्रतिक्विंटलवर होते. यामुळे गेल्या खरिपात दर्जेदार सोयाबीन बियाणे उपलब्ध झाले. पेरणीदेखील बऱ्यापैकी झाली आणि उत्पादनही काही भागात बऱ्यापैकी आले.

यंदा आपसूक अनेक शेतकरी रब्बीमधील सोयाबीन पेरणीकडे वळले आहेत. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात सुमारे ५०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी रब्बीमध्ये झाली होती. यंदा ही पेरणी जळगाव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवर पोचली आहे. तर धुळे व नंदुरबारातही बऱ्यापैकी सोयाबीन पेरणी रब्बीत झाली आहे.

तिन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी रब्बी हंगामात झाल्याचा अंदाज आहे. काळ्या कसदार जमिनीत अनेकांनी पेरणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी ठिंबकच्या मदतीने गादीवाफ्यावर पेरणी केली आहे. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड त्यासंबंधी केली आहे.

एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. अनेक शेतकरी आपल्या घरातील सोयाबीन बियाण्याचा उपयोग लागवडीसाठी केला आहे. तर काही शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीमधून सोयाबीन खरेदी केला.

त्यावर बीज प्रक्रिया करून पेरणी केली आहे. पीक बऱ्यापैकी बहरले आहे. फक्त एक फवारणी पिकाला लागेल. तसेच फवारणीतून विविध खतांची मात्रा देण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. एकदा बेसल डोसही शेतकऱ्यांनी पिकास पेरणीच्या वेळेस दिला आहे.

या भागात झाली लागवड...

जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, यावल, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, धुळे व नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात सोयाबीनची पेरणी किंवा लागवड झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT