Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

शहापूर तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून दररोज संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भाताच्या पिकाची नासाडी सुरू झाली आहे.

टीम ॲग्रोवन

खर्डी : शहापूर तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून दररोज संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) हातातोंडाशी आलेल्या भाताच्या पिकाची नासाडी (Crop Damage) सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. भाताच्या धानात पाणी (Paddy Crop Damage) भरत असल्याने भातपीक सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

तालुक्यात १५ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड केली आहे. साधारणपणे दसरा दिवाळीला भातपिकांची कापणी होत असते; परंतु महिन्याभरात दोन दिवसाआड दररोज पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी कापणी लांबली आहे; तर काही ठिकाणी कापून सुकत ठेवलेल्या लोंब्या वारंवार भिजून सडल्याने शेतकऱ्यांची मेहनत डोळ्यादेखत वाया जात आहे.

३०/३५ टक्के हळवे भात कापणीला आले आहे; तर निमगारवा व गारवा भात उभ्या शेतात रोज भिजत असल्याने सडण्याच्या मार्गावर आहे. सध्या ३० ते ४० टक्के भात शेतकऱ्यांनी कापून ठेवले आहे. पण ते भात सुरक्षित ठिकाणी ठेवले नसल्याने रोज बांधावर भिजत आहे. दिवाळी सण तोंडावर आला असून सण कसा साजरा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

शेतकऱ्यांनी शेतातील पिकलेल्या भाताच्या लोंब्या कापून सुरक्षित ठिकाणी सुकवायला ठेवल्यास भातपीक हातात येऊ शकते. बांधावर कापलेल्या लोंब्यांवर पाऊस आल्यावर ताडपत्री टाकावी.
विलास घुले, कृषी अधिकारी, शहापूर पंचायत समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT