Mumbai APMC Agrowon
ताज्या बातम्या

Mumbai APMC : मुंबई बाजार समितीतील चार संचालकांना मुदतवाढ

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार संचालकांच्या अपात्रतेबाबत राज्य सरकारने सहा आठवड्यांत निर्णय घ्यावा, तोपर्यंत त्यांच्या अपात्रतेबाबत कुठलाही निर्णय घेऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

Team Agrowon

Mumbai APMC Update मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार संचालकांच्या (APMC Director) अपात्रतेबाबत राज्य सरकारने सहा आठवड्यांत निर्णय घ्यावा, तोपर्यंत त्यांच्या अपात्रतेबाबत कुठलाही निर्णय घेऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

बाळासाहेब सोळस्कर, माधवराव जाधव, जयदत्त होळकर आणि प्रभू पाटील (Prabhu Patil) यांना या आदेशामुळे तुर्तास दिलासा मिळाला आहे.

स्थानिक बाजार समित्यांतील संचालक पदाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने आणि पुन्हा निवडणुका न झाल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील १० संचालकांचे संचालकपद धोक्यात आले आहे. या संचालकांचे तांत्रिक कारण देत पणन संचालकांनी संचालकपद रद्द करण्याचे आदेश दिले होते.

याविरोधात राज्य सरकारकडे दाद मागितल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र, त्याबाबतचे आदेश दिले नाहीत. त्यामुळे या संचालकांचे भवितव्य अधांतरी होते.

या संचालकांना कामकाजात सहभाग घेण्यापासून रोखण्यात आले होते. संचालक मंडळांची सभाही गणपूर्तीअभावी घेता न आल्याने बाजार समितीमध्ये अनेक कामे रखडली आहेत.

पणन संचालकांच्या निर्णयाविरोधात चार संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची सुनावणी झाली.

त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर संबंधित संचालकांच्या पात्र- अपात्रतेबाबत पणन विभागाने सहा आठवड्यात निर्णय द्यावा, तोपर्यंत या संचालकांना मुदतवाढ देण्याचा आदेश देण्यात आला.

चार संचालकांना मुदतवाढ दिल्याने बाजार समितीची मासिक सभा लवकरच होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सभाच न झाल्याने अनेक निर्णय प्रलंबित आहेत.

लवकरच सभा होण्याची शक्यता

अपात्र संचालकांपैकी सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी सुनावणी होण्याआधीच पदांचा राजीनामा दिला होता. तसेच नवीन सभापती, उपसभापती निवडीची सभाही रद्द केली होती.

आता चार संचालकांना मुदतवाढ दिल्याने पुढील काही दिवसांत सभा होऊ शकते. तसेच सभापती, उपसभापती निवडीचा निर्णय पणन विभागाच्या निर्णयानंतरच होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wedding Expenses : अतिवृष्टीबाधित कुटुंबातील लग्नाचा खर्च शिवसेना करणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

Fruit Processing: विना कर्ज, प्रशिक्षण, कौशल्यातून मोठा केलेला प्रक्रिया उद्योग

Local Body Elections: बारा नोव्हेंबरला मतदार यादी होणार जाहीर

Sugarcane Rate Protest: कोल्हापूर जिल्ह्यात कारखाना समर्थक- ऊस आंदोलकांमध्ये संघर्ष

Flower Farming: फुलशेतीतील मूल्यवर्धनातून कुटुंबाला आर्थिक सक्षमता

SCROLL FOR NEXT