Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३२ मंडलांत अतिवृष्टी

जिल्ह्यात शुक्रवारी (ता.८) झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे सात तालुक्यांसह तब्बल ३२ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.८) झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे (Rainfall) सात तालुक्यांसह तब्बल ३२ मंडलांत अतिवृष्टीची (Heavy Rain) नोंद झाली. हा पाऊस नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, भोकर, धर्माबाद, उमरी, बिलोली, हिमायतनगर, नायगाव या तालुक्यांत जोरदार झाला. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यात हजारो हेक्टरवरील पिकांसह पूल, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस तुरळक प्रमाणात होता. परंतु मागील दोन दिवसांपासून पावसाने तुफान हजेरी लावत सर्वत्र पाणीच-पाणी केले आहे. शुक्रवारी रात्रभर झालेला पाऊस अद्यापही सुरू आहे. १२ मंडलांत साठ ते ६५ मिलिमीटरपर्यंत, तर २९ मंडलांत ३० ते ६० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील हजारो हेक्टरवरील खरिपातील पिकांसह बागायती पिके पाण्याखाली गेली आहेत. तर पुरामुळे पूल, रस्ते खरडून गेले आहेत. जिल्ह्यात शनिवारी (ता.९) सकाळी साडेदहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ५८.८० मिलिमीटर पाऊस झाला. यंदा आजपर्यंत एकूण ३१३.८० मिलिमीटरनुसार ३५.२१ टक्के पावसाची नोंद झाली.

तालुकानिहाय पाऊस

नांदेड ९५.७०, बिलोली ६०.२०, मुखेड ३०.६०, कंधार ५२.९०, लोहा ६९.९०, हदगाव ४९.३०, भोकर ७८.३०, देगलूर २९.९०, किनवट ३०.८०, मुदखेड ११०.२०, हिमायतनगर ६०.८०, माहूर २७.९०, धर्माबाद ६५.७०, उमरी ७६.१०, अर्धापूर ११०.८०, नायगाव ६१.१०.

अतिवृष्टी झालेली मंडले

नांदेड शहर ९८, तूप्पा ८९, वसरणी ९६.२५, विष्णुपुरी १०९.७५, लिंबगाव १११.२५, वाजेगाव ९२.५०, नाळेश्‍वर ९५, उस्माननगर ८८.५०, कापसी बुद्रुक ११५.५०, कलंबर ६८.७५, हदगाव ८२.७५, तामसा ८२, आष्टी ७६.२५, भोकर ७७.५०, मोघाळी ७७.५०, मातूळ ७६, किणी ८२.२५, इस्लापूर ७७.५०, मुदखेड १२४, मुगट ७१.२५, बारड १३५.२५, जवळगाव ६६.७५, सिरजखेड ७१.२५, उमरी ७१.२५, सिंधी ९०.७५, धानोरा ९३.७५, अर्धापूर ११२, दाभड ११८.२५, मालेगाव १०२, बरबडा ८३.७५, कुंटूर ८५.२५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था

Dairy Farming Training: पशुपालन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ४२ शेतकरी गुजरातला रवाना

Agricultural Land: शेतजमीनधारकांना मोठा दिलासा! शर्तभंग नियमित करण्याबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

Water Supply Issues: तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय वेळेवर पाणीपुरवठा अशक्य : डॉ. राजेंद्र दाते पाटील

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT