Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar Meeting LIVE : ८२ वय झालंय, आता तरी थांबणार की नाही? अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल

NCP Rebellion Separate Meetings : ``शरद पवार माझे दैवत आहेत. परंतु आता तुमचं ८२ वर्षांचं वय झालंय. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आता आराम करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या', अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला.

Team Agrowon

NCP Crisis :राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात रविवारी (२ जून ) बंड झाले. या बंडानंतर पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार गटाकडून वांद्रे येथील एमईटी इन्स्टिट्यूटमध्ये बुधवारी (ता. ५) बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना अंगावर घेतल्यामुळे दोघांमधील राजकीय संघर्ष इथून पुढच्या काळच्या अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत.

२०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजपबरोबर सत्ता स्थापन करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. परंतु प्रत्येक वेळी शरद पवार यांनी अचानक माघार घेतल्यामुळे ते प्रयत्न फलद्रुप होऊ शकले नाहीत, असा आरोप अजित पवार यांनी केला. दरवेळेस आपल्याला खलनायक ठरवले गेले, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या निर्मितीपासून पक्षाने अनेक भूमिका बदलल्या, अशी टीका त्यांनी केली.

देशाचा इतिहास पाहिला तर करिष्मा असलेला नेतृत्व लागतो. मोदीच्या करिष्म्यामुळे नऊ वर्षांपासून देशात भाजप सत्तेवर आहे. जर त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नसेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे? मतदारसंघातील कामे करायची असतील तर भाजपसोबत जायला पाहिजे. अशी सर्वच राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा होती. २०२२ मध्ये विधानसभेचे ५३ आणि ९ विधानपरिषदेचे आमदारांनी भाजपसोबत जाण्याबाबत शरद पवारांना पत्र दिले होते. पण त्यावेळी निर्णय न घेतल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

अजित पवार म्हणाले, आज आपल्या पक्षातील अनेकांचे साखर कारखाने अडचणीत आहेत. जिल्हा बॅंका अडचणीत आहेत. त्या बाहेर काढायचे असेल, सत्तेत सहभागी राहिले पाहिजे. दिल्लीत विरोधकांची एकजूट होणे शक्य नाही. मग विरोधकांसोबत जाण्याचा हट्ट कशाला?, तुम्ही आता थांबलं पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, रुपाली चाकणकर, सुनील चव्हाण व आमदार उपस्थित होते. या बैठकीला राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सभागृहात अजित पवारांसोबत असल्याबाबतची प्रतिज्ञापत्रे घेण्यात आली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे व रुपाली चाकणकर यांची भाषणे झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT