Electricity  Agrowon
ताज्या बातम्या

Electricity : आठ तासही सुरळीत वीज मिळेना

जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी विद्युत पंपाची जोडणी करीत आहेत.

टीम अॅग्रोवन.

नांदेड : जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी (Farmer) विद्युत (Electricity) पंपाची जोडणी करीत आहेत. परंतु जिल्ह्याच्या अनेक भागात आठ तास मिळणारी थ्रीफेस वीज टिकत नसल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी खरिपानंतर रब्बी हंगामही हातून जाण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणी सुरु आहे. आजपर्यंत एक लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई या रब्बी पिकांचा समावेश आहे. तर खरिपातील कपाशी व तूर या पिकांनाही पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकरी कृषी पंपाची जोडणी करत आहेत. जिल्ह्यात महावितरणकडून आठ दिवस दिवसा तर आठ दिवस रात्रीच्यावेळी आठ तास थ्रीफेज वीज दिली जाते.

परंतु मागील पंधरा दिवसापासून थ्रीफेज वीज टिकत नाही. एक तासात आठ ते दहावेळा ट्रीप होत असल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असून ते पिकांना देता येत नाही. परिणामी रब्बीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने महावितरण कंपनीला निर्देश देवून शेतकऱ्यांना योग्य दाबाने किमान आठ तास वीज मिळेल याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Village : शेळकेवाडी झाले शंभर टक्के सौरग्राम

Rural Development : ग्रामविकासाचे ठरवा शाश्‍वत धोरण

E Pik Pahani : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ई-पीक पाहणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Tomato Farming: टोमॅटो लागवडीत पीक संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर

Farmer Producer Companies: शेतकरी कंपन्या, सहकारी संस्थांमार्फत शेतीमाल विक्री

SCROLL FOR NEXT