Sorghum Agrowon
ताज्या बातम्या

हरभरा, धानानंतर आता ज्वारीच्या सरकारी खरेदीचा गुंता

१५ ते ३० एप्रिल असा नोंदणीचा कालावधी होता.त्यास तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला असताना ‘नाफेड’कडून खरेदी सुरू होण्याचे कोणतेच संकेत नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूरः राज्यात हमीभावाने हरभरा, धान खरेदीचा तिढा कायम आहे. तोच दीड महिन्यापूर्वी नोंदणी करूनही ज्वारी खरेदीला सुरुवातच झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खरीप हंगामात ज्वारी विक्रीतून आलेल्या पैशातून निविष्ठा खरेदीची तजवीज शेतकरी करतात. मात्र ‘नाफेड’ने (NAFED) खरेदीच सुरू न केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यातील औरंगाबाद, नगर, नाशिक, जळगाव, खानदेश, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये ज्वारीखालील क्षेत्र आहे. याच जिल्ह्यांत ‘नाफेड’कडून हमीभावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्णत्वास गेली. १५ ते ३० एप्रिल असा नोंदणीचा कालावधी होता.त्यास तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला असताना ‘नाफेड’कडून खरेदी सुरू होण्याचे कोणतेच संकेत नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरवर्षी जून महिन्यात खरेदी सुरू होते. गेल्या हंगामात जून महिन्यातच खरेदी सुरू करण्यात आली. यंदा ‘नाफेड’कडे राज्यात १५ हजारांवर शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

व्यापाऱ्यांनी दर पाडल्याचा आरोप

‘नाफेड’कडून २७३८ रुपये हमीभावाने ज्वारीची खरेदी होणार होती. त्यामुळेच बाजारात ज्वारीच्या दरात तेजी येत २००० रुपयांनी सुरुवातीला व्यापाऱ्यांनी ज्वारी खरेदी केली; परंतु ‘नाफेड’कडून हमीभावाची शक्यता नसल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्‍यांनी आता दर पाडले आहेत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बाजारात ज्वारीचे दर आता १७०० ते १८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

निदान भाव फरक द्यावा

ज्वारीची ‘नाफेड’ला विक्री करून शेतकरी बी-बियाणे, खताची उचल करतात. परंतु खरेदीबाबत अनिश्‍चितता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ‘नाफेड’ला खरेदी शक्य नसेल तर निदान भाव फरक द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT