Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : दीड महिन्यानंतरही अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत नाही

२५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे

Team Agrowon

सोलापूर ः यंदा अतिवृष्टीने खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सलग तीन महिन्यात हे नुकसान झाले. त्यानंतर ऑगस्टमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १४७ कोटी रुपयांची मदत मिळाली. पण त्यानंतरच्या दोन महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तरतूद केलेली २५८ कोटी रुपयांची मदत अद्यापही मिळालेली नाही.

सोलापूर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला. खरिपातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि मटकी यासारख्या सर्वच पिकांचे त्यात नुकसान झाले. त्यातही सर्वाधिक सोयाबीनला फटका बसला. नुकसानीच्या या तीव्रतेमुळे पंचनामेही बरेच दिवस चालले. त्यामुळे आधी पंचनामे आणि पुन्हा नुकसानभरपाईचे प्रस्ताव यामध्ये बराच वेळ गेला

. पहिल्या टप्प्यात दिवाळी आधी मदत देऊ, असे आश्वासन देऊनही ऑगस्टमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिवाळीनंतरच मिळाली, पण त्यासाठीही तब्बल दोन-अडीच महिने गेले. त्यानंतरच्या दोन महिन्यात झालेल्या नुकसानीत तब्बल एक लाख ५३ हजार ७८१ शेतकऱ्यांच्या एक लाख २१ हजार ४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे २५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यापैकी ३६ कोटी २ लाख रुपयांना मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. पण त्यापैकीही एका रुपयाचे वाटप अद्यापही झालेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT