Soybean  Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Sowing : नगर जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

Cotton Sowing : यंदा पाऊस लांबला आहे. त्याचा परिणाम खरिपातील पेरण्यांवर होत आहे. यंदा मूग, उडदाची पेरणी होण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : यंदा पाऊस लांबला आहे. त्याचा परिणाम खरिपातील पेरण्यांवर होत आहे. यंदा नगर जिल्ह्यात मूग, उडदाची पेरणी होण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे. त्यामुळे उशिराने पेरण्या झाल्यास यंदा तूर, कापूस व सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. परतीच्या पावसात होणारे नुकसान आणि कमी दर यामुळे गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाही बाजरीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज आहे.

राज्यात खरिपाचे १ कोटी ४२ लाख ०२ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी साधारणपणे ३० मेपासूनच वळवाच्या पावसाला तर १० जूनपर्यंत मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होते. त्यानंतर सुरुवातीच्या काळात मूग, उडदाची पेरणी उरकली जाते. यंदा पावसाअभावी पेरण्या झालेल्या नाहीत.

पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी ७६ हजार ७६९ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. त्यात कापूस ६७ हजार हेक्टरवर आहे. मात्र बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मक्याची पेरणी झालेली नाही. साधारपणे ८० मिलिमीटरपर्यंत पाऊस होऊन सहा ते सात इंच खोलवर जमिनीत ओल गेल्यानंतर पेरणी करावी, असे कृषी विभाग सातत्याने आवाहन करत आहे.

यंदा मूग, उडदाची सरासरीच्या निम्मीही पेरणी होण्याची शक्यता दिसत नाही. कापूस, तूर, सोयाबीन पेरणी ३० जुलैपर्यंत अपेक्षित आहे. त्यामुळे मूग, उडीद घेणारे शेतकरी मका, तूर, कापसाकडे वळण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढेल. नगर, सोलापूर भागांत तूर वाढीचा अंदाज आहे.

राज्यात बाजरीचे खरिपातील प्रमुख होते. मात्र अलीकडच्या काही वर्षांत बाजरीचे क्षेत्रही घटत आहे. साधारण १५ जुलैपर्यंत बाजरी पेरली जाते. यंदा वेळेत पाऊस आला नाही तर बाजरीलाही मोठा फटका बसण्याची शक्यता दिसत आहे. बाजरीच्या जागीही कापूस, सोयाबीन वाढेल, असा अंदाज आहे.

बियाणे विक्री नाही

खरिपात पेरणीसाठी कृषी विभागाने प्रस्तावित क्षेत्रानुसार नियोजन केले. बियाणे बदलाच्या प्रमाणानुसार बियाण्यांची मागणी केली. बऱ्यापैकी बियाणे उपलब्धही झाले. मात्र लांबलेल्या पावसाचा बियाणे विक्रीवरही परिणाम झाला आहे. आधी पेरल्या जाणाऱ्या मूग, उडदांसह कापूस, सोयाबीन, बाजरी, तुरीच्या बियाणे विक्रीला फारसा प्रतिसाद नाही. बाजारात शुकशुकाट आहे.

राज्यातील सरासरी खरीप क्षेत्र (हेक्टर)

भात ः १५,०८,३७४

बाजरी ः ६,६९,०८९

खरीप ज्वारी ः २,८८,६१५

रागी ः ७८,०४९

मका ः ८,८५,६०८

तूर ः १२,९५,५१६

मूग ः ३,९३,९५७

उडीद ः ३,७०,२५२

कापूस ः ४२,०१,१२८

सोयाबीन ः ४१,४९,९१२

मूग, उडदाचे कर्जत, जामखेड तालुक्यांत क्षेत्र अधिक असते. या पिकांची पेरणी जास्तीत जास्त उशीर झाला तरी ७ जुलैपर्यंत होईल की नाही सांगता येत नाही. वेळेत पाऊस आला नाही तर पेरणी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता दिसतेय. त्याजागी तूर, सोयाबीन पेरणी व कापूस लागवड होईल असे दिसतेय.
- पद्मनाभ मस्के, तालुका कृषी अधिकारी, कर्जत, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Food: विविधतेचा बळी देऊन सपाटीकरण कशासाठी?

Agricultural Culture: शेती पद्धती बदलण्याची तीव्र निकड

Gay Gotha Scheme: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना

Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?

Soybean Farming: सोयाबीन पिकावर वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT