Farmer Kvk Visit Agrowon
ताज्या बातम्या

Sindewhai KVK : शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची सिंदेवाही येथे स्थापना

शेतकरी-शास्त्रज्ञ मंच ही संकल्पना त्यांनी मांडली आहे. सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राने या संकल्पनेवर काम करीत सहा तालुक्ं‍यातील ३७ शेतकऱ्यांची या उपक्रमासाठी निवड केली आहे.

Team Agrowon

चंद्रपूर ः केव्हीके सिंदेवाही अंतर्गंत कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांच्या संकल्पेनतील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून शेतकरी, शास्त्रज्ञांमध्ये संवादाला प्रोत्साहन देण्यात येत तंत्रज्ञान प्रसाराचा उद्देश साधण्याचे अपेक्षित आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Agriculture University) कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी शेतकरी- शास्त्रज्ञ यांच्यात संवाद वाढावा याकरिता पुढाकार घेतला आहे. यातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती करताना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा होत त्याचे समाधान शोधत येणार आहे.

त्याकरीता शेतकरी-शास्त्रज्ञ मंच ही संकल्पना त्यांनी मांडली आहे. सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राने या संकल्पनेवर काम करीत सहा तालुक्ं‍यातील ३७ शेतकऱ्यांची या उपक्रमासाठी निवड केली आहे. त्यामध्ये सिंदेवाही, मूल, नागभीड, सावली, ब्रह्मपुरी, चिमूर या तालुक्‍यांचा समावेश आहे.

मंचच्या अध्यक्षस्थानी मच्छिंद्र घिगू रामटेके या प्रगतीशील शेतकरी यांची निवड करण्यात आली. डॉ. विजय एन. सिडाम हे सचिव राहतील. या उपक्रमाचा या भागातील शेतकऱ्यांना निश्‍चीत लाभ होईल, असा विश्‍वास यानिमित्ताने व्यक्‍त करण्यात आला. सिडाम यांनी या उपक्रमाची स्थापना, उद्दिष्टे आणि कार्य याविषयी माहिती दिली.

डॉ. व्ही. जी. नागदेवते यांनी हरभरा, जवस, मोहरी या रब्बी पिकातील खत व्यवस्थापन, कीडरोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. यावेळी उपक्रमात सहभागी सर्व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शेतकरी सदस्यांना सिंदेवाही विज्ञान केंद्र तसेच गरुडा एरोस्पेस दिल्ली यांच्या वतीने ड्रोनद्वारे फवारणी विषयीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Pesticide: बनावट कीडनाशकांची उलाढाल ११ हजार कोटींवर

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढतोय

Maharashtra Drought Declaration: नव्याने १९ तालुके दुष्काळी

Agriculture PG Admission: पदव्युत्तर प्रवेशावरील तक्रारींवर कृषी परिषदेचा खुलासा

Sugar Hoarding Restrictions: साखरेच्या साठ्यावर केंद्राची मर्यादा

SCROLL FOR NEXT