Admission Issue: कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या प्रवेश फेरीत पुणे कृषी महाविद्यालयात झालेल्या गोंधळाबाबत काही पालक आणि विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींवर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक शिक्षण डॉ. किशोर शिंदे यांनी ३० सप्टेंबर रोजी मुद्देनिहाय स्पष्टीकरण दिले.