KVK, Kharpudi : काढणी पश्चात तंत्रज्ञान, मूल्यवर्धनावर देणार भर

कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत निश्‍चय
 processing
processingAgrowon

वर्षाच्या कृती आराखड्यात रेशीम उद्योग (Silk Farming), पशु संवर्धन, मत्स्य व्यवसाय (Fishery), नैसर्गिक शेती (Natural Farming) , ड्रोन तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पद्धती, काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धन या विषयांवर भर देण्याचा निश्चय कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना यांच्या शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आला.

 processing
SMART Project : स्मार्ट प्रकल्पातून मूल्यवर्धनावर भर द्या ः राजेंद्र साबळे

शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक मंगळवारी (ता. २७) मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त विजयअण्णा बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बोराडे यांनी तशी सूचना केली. या बैठकीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर, आयसीएआर-अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, औरंगाबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते,

सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय जे. एम. शेख, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक, तेजल क्षीरसागर, सामाजिक वनीकरण विभागाचे, वन परिक्षेत्र अधिकारी एस. एन. जाधव, जिल्हा मृद व जल संधारण कार्यालयाचे प्रतिनिधी वी. डी. ढोबळे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे विस्तार अधिकारी एस. एन. अदमाने, जिल्हा परिषेदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे-चाटे, शेतकरी प्रतिनिधी उद्धवराव खेडेकर,

 processing
सोलापूर ः कृषि विज्ञान केंद्रात काढणी पश्चात  तंत्रज्ञान, पॅकिंगवर प्रशिक्षण 

भगवानराव डोंगरे, रमेश खांडेभराड, महिला शेतकरी प्रतिनिधी सुभद्रा जाधव, बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. डी. सोमवंशी, खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख तथा सदस्य सचिव डॉ. एस. व्ही. सोनुने यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ उपस्थित होते.
बैठकीत कृषी विज्ञान केंद्राने जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला, तसेच जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षातील कृती आराखड्याचे

अवलोकन करण्यात आले. सर्व प्रथम केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी मागील बैठकीतील शिफारशी व त्यावर केलेली कार्यवाही यावर सादरीकरण तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या महत्त्वाच्या उपलब्धींबाबत सभागृहास माहिती दिली. अध्यक्ष विजयअण्णा बोराडे यांनी सर्व सूचनांचा पुढील वर्षाच्या कृती आराखड्यात समावेश करण्याचे सूचित केले.  

डॉ. लाखन सिंग म्हणाले, की जिल्ह्यातील पावसाचा बदलता कल लक्षात घेऊन त्यानुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे. कृषी विज्ञान केंद्राने पोषक तृण धान्यांच्या प्रचार प्रसारावर लक्ष केंद्रित करून गावांशी संपर्क वाढवावा. झालेल्या परिणामांचे पृथ्थकरण करण्याचे आवाहन केले. डॉ. देवसरकर म्हणाले,
की सोयाबीनची आधुनिक तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिके घ्यावीत. उसाची नवीन जात १५०१२ याचे बेणे मिळवून त्यावर प्रयोग करावेत.

बैठकीदरम्यान सदस्यांकडून आलेल्या सूचना
कोरडवाहू तुती लागवडीवर प्रयोग करून त्याची उत्पादन क्षमता तपासावी तसेच सिल्क अँड मिल्क मॉडेल जिल्ह्यात राबविण्यासाठी केव्हीकेने पुढाकार घ्यावा.
शेततळ्यातील मत्स्यपालनास चालना मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.
रेशीम कोषांपासून धागा आणि त्यापासून पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण महिला बचत गटांना मिळावे.

नैसर्गिक शेतीबाबत व्यवहार्य शिफारशी विद्यापीठाकडून याव्यात.
पशु आधारित उत्पादनांचे मूल्यवर्धन व प्राक्रिया यावर केव्हीकेने भर द्यावा.
मोसंबीमधील सिट्रस ग्रीनिंग या रोगाबाबत जनजागृती करून विद्यापीठाच्या मदतीने उपाययोजना सुचवाव्यात.
जिल्ह्यातील प्रमुख पिकांवर अत्त्युच्च उत्पादनाच्या हेतूने उच्च तंत्रज्ञान आधारित प्रात्यक्षिक राबवावीत.
कृषी विज्ञान केंद्राने आपल्या नियोजनात हवामान बदल आधारित तंत्रज्ञानावर जास्त भर द्यावा.

 processing
Turmeric Harvesting : सुधारित पद्धतीने हळद काढणी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com