KCR At Pandharpur Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : ३०० गाड्यांच्या ताफ्यासह तेलंगणाचं अख्खं मंत्रिमंडळ पंढरपुरात येणार ; केसीआर करणार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

BRS Party In Maharashtra : तेलंगणा सरकारचे अख्खे मंत्रिमंडळ येत्या २७ जूनला पंढरपुरमध्ये येणार आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाचा लवाजमा घेवून मुख्यमंत्री केसीआर विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत.

Team Agrowon

Bharat Rashtra Samiti News : 'अब की बार किसान सरकार'चा नारा देत बीआरएस महाराष्ट्रात हातपाय पसरण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांत केसीआर यांच्या नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सभाही झाल्या आहेत. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आणखी पाय रोवण्यासाठी बीआरएसने आषाढी वारीचा मुहूर्त साधला आहे.

याच पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारचे अख्खे मंत्रिमंडळ येत्या २७ जूनला पंढरपुरमध्ये येणार आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाचा लवाजमा घेवून मुख्यमंत्री केसीआर विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. यावेळी आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टही करण्यात येणार आहे.

विठुरायाच्या ओढीने राज्यभरतील लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संताच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. अशातच आपल्या पक्षाचा विस्तारासाठी आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी तेलंगणाचे मुख्यमंक्षी केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपुरात येणार आहेत.

वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

काही दिवसांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वाखरीच्या पालखी स्थळावर १५ लाख वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

३०० गाड्यांच्या ताफा

आगामी निवडणुकांच्या तोंडावर बीआरएस महाराष्ट्रात पक्ष विस्तार करत आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना फोडून बीआरएसमध्ये पक्षप्रवेश करून घेतला आहे. बीआरएसच्या महाराष्ट्रातील पक्षविस्तारच्या पार्श्वभूमीवर येत्या २७ जूनला तेलंगणा सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ सोलापुरात दाखल होणार आहे. सुमारे ३०० गाड्यांचा लवाजमा घेवून मुख्यमंत्री केसीआर मंत्रिमंडळासह पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार आहेत.

दरम्यान, देशात लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्र समिती पक्षानेही (बीआरएस) आपला विस्तार वाढवत आहे. बीआरएसने पक्ष विस्ताराची सुरूवात महाराष्ट्रातून केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या महाराष्ट्रात सभाही झाल्या आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT